यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्रातर्फे

यशवंराव चव्हाण गौरव पुरस्कार २०१९

WhatsApp Image 2019 11 20 at 9.45.33 PM

नवी मुंबई, २१ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्रातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा यशवंराव चव्हाण गौरव पुरस्कार २०१९ या वर्षी नेरुळच्या 'युथ कौन्सिल' ह्या संस्थेस मा. दिलीप वळसे -पाटील यांच्या हस्ते शनिवार,दि. ३० नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ४.३० वाजता स्टर्लिंग कॉलेज हॉल, सेक्टर १९, नेरुळ येथे समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
या प्रसंगी प्रख्यात कविवर्य अशोक नायगावकर यांचा कवितेचा धमाल कार्यक्रमही होणार आहे.
तरी, या कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्रातर्फे
‘यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्रा तर्फे ‘यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार’ देण्यात येणार असून मानपत्र व रोख रू २०,००० असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड यांनी दिली आहे. मराठी साहित्य, संस्कृती तसेच कला-क्रिडा या शिवाय सामाजिक एकात्मता, विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामिण विकास, आर्थिक सामाजिक विकास, कृषी औद्योगीक समाज रचना, व्यवस्थापन प्रशासन यांपैकी कोणत्याही एका क्षेत्रामध्ये भरीव कार्य अथवा योगदान करणा-या व्यक्ति किंवा संस्थेस यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार सभारंभपुर्वक दि. २५ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रदान केला जाणार आहे. इच्छुक व्यक्ती अथवा संस्थेने प्रमोद कर्नाड संपर्क ९८६७६७३३१९/ ९०८२६९८९०४ किंवा ९८१९३३९९४४ या भ्रमण ध्वनीवर संपर्क साधून दि. २५ ऑक्टोबर पूर्वी आपली प्रवेशिका प्रतिष्ठानकडे सादर करावी, असे अध्यक्ष प्रमोद कर्नाड व सचिव डॉ. अशोक पाटील यांनी कळविले आहे.

   

विभागीय केंद्र - नवी मुंबई

मा. प्रमोद कर्नाड
अध्यक्ष विभागीय केंद्र, नवी मुंबई
डॉ. अशोक पाटील, सचिव
द्वारा प्रमोद कर्नाड, ०३/ए-१, अलकनंदा, 
कै. सौ. हिर कर्नाड मार्ग, सेक्टर-१९ए
नेरुळ, नवी मुंबई - ४००७०७.
संपर्क : ९८१९३३९९४४ /९८६७६३३९९
ईमेल : pramodkarnad@gmail.com, 
ycpnavimumbai@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft