अंमली पदार्थ सेवनाविरोधात जनजागृती रॅली...

WhatsApp Image 2020 02 15 at 8.49.38 AM

बहुतांश शाळा कॉलेजातील मुले ही अंमली पदार्थ सेवनाच्या आहारी जातात. वाईट संगतीत राहून आयुष्य खराब करून घेतात.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र 
नवी मुंबई व अन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने SIES महाविद्यालयातील विध्यार्थ्यांच्या माध्यमातून अंमली पदार्थ सेवना विरुद्ध शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३०वाजता SIES कॉलेज ते नेरुळ रेल्वे स्टेशन व परत अशी सुमारे ६ किलोमीटरची रॅली काढण्यात आली. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड, अन्वय प्रतिष्ठानचे डॉ. अजित मगदूम, प्रा. वृशाली मगदूम, कॉलेजचे प्राचार्य, अध्यापक व भाग घेणारे सुमारे २०० विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते.

व्यक्तिमत्व विकास आणि करिअर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन...

15 feb careerguidence

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नवी मुंबई तर्फे शनिवार १५ फेब्रुवारी २०२० रोजी स्टर्लिंग कॉलेज, सेक्टर १९ ए, नेरुल येथे व्यक्तिमत्व विकास आणि करिअर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. चाणक्य मंडळ परिवाराचे सिद्धार्थ अविनाश धर्माधिकारी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

   

विभागीय केंद्र - नवी मुंबई

मा. प्रमोद कर्नाड
अध्यक्ष विभागीय केंद्र, नवी मुंबई
डॉ. अशोक पाटील, सचिव
द्वारा प्रमोद कर्नाड, ०३/ए-१, अलकनंदा, 
कै. सौ. हिर कर्नाड मार्ग, सेक्टर-१९ए
नेरुळ, नवी मुंबई - ४००७०७.
संपर्क : ९८१९३३९९४४ /९८६७६३३९९
ईमेल : pramodkarnad@gmail.com, 
ycpnavimumbai@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft