मराठी ग्रंथ संग्रहालयात रंगले बहुभाषिक काव्यसंमेलन

WhatsApp Image 2020 02 19 at 10.02.30 AM 3

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमुंबईठाणे जिल्हा केंद्राच्या वतीने बहुभाषा काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉमहेश केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या संमेलनात शशिकांत तिरोडकर यांनी त्यांची 'मिठीनदीवरील कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणलीदिलीप सावंत यांनी त्यांच्या मराठी कवितांचं सादरीकरण केलेतर हरी मृदुल यांनी हिंदीतल्या ''चादर', 'खेल ही खेल में', 'देश की खातिर', 'अमेरिका', 'जेब में गांधी मसलन पांच सौ का नोट', 'मटर की फलियों के बहाने', 'और' अश्या सद्य परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या कविता सादर केल्याप्राजक्ता सामंत यांनी मालवणी भाषेतून राजूल भानुशाली यांनी गुजरातीतून तरफिलोमीना यांनी मी जर मुलगा असती तर याविषयावरील कोंकणी कवितेने रसिकांना मंत्रमुग्ध केलं. गझलकार गोविंद नाईक यांनीमराठी गझल सादर करून श्रोत्यांची मन जिंकली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर नाले, उपाध्यक्ष डॉमहेश केळुसकर, खजिनदार जवकरसदस्य श्याम घोरपडे, डॉवसुधा सहस्त्रबुध्ये तसेच निमंत्रित मान्यवरांच्या साक्षीने स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झालीत्यानंतर संस्थेचे सचिव श्री. अमोल नाले यांनी उपस्थितांना प्रतिष्ठानच्या ध्येय धोरणांचा तसेच बहुभाषा काव्यसंमेलनासाठी आलेल्या निमंत्रित पाहुण्यांचा थोडक्यात परिचय करून दिलाया सर्व मान्यवरांचा संस्थेच्या कार्यकरिणीकडून संस्थेचे अध्यक्ष श्री. मुरलीधर नाले यांनी सत्कार केला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉमहेश केळुसकर यांनी केले.
सदर कार्यक्रमास रसिकांनी आवर्जून उपस्थिती लावली असल्यामुळे कार्यक्रम शेवटपर्यंत रंगत गेला. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारीगझलकार चंद्रशेखर सानेकरपत्रकार आणि रसिक आवर्जून हजर होतेसरतेशेवटी संस्थेचे सचिव अमोल नाले यांनी सर्वांचे आभार मानून राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

WhatsApp Image 2020 02 11 at 6.09.57 PMबहुभाषा कविसंमेलनाचे आयोजन...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र ठाणे तर्फे बहुभाषा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. महेश केळुसकर हे या कविसंमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. निरनिराळ्या भाषा घेऊन शशिकांत तिरोडकर (मराठी), प्राजक्ता सामंत (मालवणी), दिलीप सावंत (मराठी), गोविंद नाईक (मराठी), हरी मृदुल (हिंदी), रूजुल भानुशाली (गुजराती), फिलोमिना सॅमफ्रान्सिको (कोकणी) हे कविसंमेलनात सहभाग घेणार असून रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ५.३० वाजता, मराठी ग्रंथ संग्रहालय, तिसरा मजला, राजावत ज्वेलर्स समोर, गोखले रोड, ठाणे (प.) येथे हे कविसंमेलन पार पडेल. तरी अशा बहुभाषिक कविता ऐकण्यासाठी आपण या कविसंमेलनास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

   

विभागीय केंद्र - ठाणे

मा. श्री. मुरलीधर नाले
अध्यक्ष विभागीय केंद्र, ठाणे
मा. श्री. अमोल नाले, सचिव
१६, श्री सदिच्छा, मीठबंदर रोड,
चेंदणी, ठाणे (पूर्व) - ४००६०३

कार्यालय : ०२२-२५३२६७३४ / ९७६९६०३२३९
ईमेल : amolmnale30@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft