ठाणे विभागातर्फे रक्तदान शिबिर संपन्न..

WhatsApp Image 2021 05 01 at 7.36.45 PM 2

१ मे २०२१ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,ठाणे जिल्हा केंद्रातर्फे डोंबिवली येथील रिजन्सी इस्टेट येथे रक्तदान शिबिर झाले.यावेळी ३४ नागरिकांनी रक्तदान केले तर १६ महिला कमी H B मुळे रक्तदानापासून वंचित राहिल्या.यावेळी अचानक मनसेचे मा.आमदार श्री.राजेश पाटील व कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या उपयुक्त यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली आणि आपल्या स्तुत्य कार्यक्रमाची दखल घेतली व अभिनंदन तसेच आभार मानले.

ठाणे केंद्रातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन...

WhatsApp Image 2021 04 28 at 9.03.40 AM

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागिय केंद्र ठाणे आणि रीजेन्सी इस्टेट को-ऑप.हौ.सो. यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत. कम्युनिटी हॉल, रिजेन्सी इस्टेट को.ऑप. हौ. सो. मौजे आजदे गोवाली, कल्याण शिळफाटा रोड, डोंबिवली (पू.) येथे रक्तदान शिबीर होणार आहे. तरी सर्व पात्र रक्तदात्यांना विनंती आहे की, कृपया या शिबिराला भरभरुन प्रतिसाद देऊन रक्तदान करावे. आपले रक्तदान एखाद्या गरजू व्यक्तीचा जीव वाचवू शकेल. कृपया दात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन ठाणे केंद्राचे अध्यक्ष मुरलीधर नाले यांनी केले आहे.

   

विभागीय केंद्र - ठाणे

मा. श्री. मुरलीधर नाले
अध्यक्ष विभागीय केंद्र, ठाणे
मा. श्री. अमोल नाले, सचिव
१६, श्री सदिच्छा, मीठबंदर रोड,
चेंदणी, ठाणे (पूर्व) - ४००६०३

कार्यालय : ०२२-२५३२६७३४ / ९७६९६०३२३९
ईमेल : amolmnale30@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft