चित्रपट रसग्रहण शिबीर ठाण्यामध्ये...

fb11

यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे नववं वर्ष असून ह्या वर्षीही १८ जानेवारी ते २४ जानेवारी रोजी चव्हाण सेंटरच्या तीन सभागृहातून ७५-८० चित्रपट दाखवले जाणार आहेत.तसेच,दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महोत्सवाचा पूर्वरंग म्हणून, आपण, चित्रपट रसग्रहण शिबीर आयोजित करीत आहोत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई आणि ठाणे जिल्हा केंद्रातर्फे आयोजित हे शिबीर १ डिसेंबर २०१८ रोजी ठाणे पूर्व येथील मंगला हॉल,तळ मजला,मंगला हायस्कुल,रेल्वे स्थानकाजवळ,ठाणे पूर्व येथे  आयोजित करीत आहोत. ख्यातनाम सिनेमा व नाट्य दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व चित्रपट अभ्यासक श्री. समर नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर होणार आहे.

हे शिबिर सकाळी १० ते ४.३० वाजेपर्यंत असणार आहे.यात विविध चित्रफिती आणि प्रश्नोत्तरांबरोबरच चित्रपट विषयक माहितीपर मार्गदर्शन मिळणार आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्यांना सिनेमाची अशी एक चित्रभाषा असते ती समजून घेण्यासाठी व आपल्या भावना आणि विचारांना चालना देण्याचे कार्य सिनेमाच्या माध्यमातून कसे केले जाते हे सिनेमातील काही उदाहरणावरून समजून देण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम विनामूल्य असून भोजनाची व्यवस्था देखिल करण्यात येणार आहे. जागा मर्यादीत असल्याने यासाठी पुर्व नोंदणी आवश्यक आहे. तरी आपली नोंदणी 9769603239 या नंबर वर sms अथवा whatsapp द्वारे आपले नाव लिहून, लवकरात लवकर करावी अशी विनंती अमोल नाले, सचिव यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,ठाणे जिल्हा केंद्र यांनी केली आहे

ठाणे विभागातर्फे सत्याविरुध्दचे प्रचारयुग या विषयावरती व्याख्य़ान

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र ठाणे आणि बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, ठाणे यांच्या संयुक्तविद्यमाने यशवंत व्याख्यानमाला कार्यक्रमांतर्गत सत्याविरुध्दचे प्रचारयुग या विषयावरती ज्येष्ठ पत्रकार राजू परूळेकर मार्गदर्शन करणार आहेत.

   

विभागीय केंद्र - ठाणे

मा. श्री. मुरलीधर नाले
अध्यक्ष विभागीय केंद्र, ठाणे
मा. श्री. अमोल नाले, सचिव
१६, श्री सदिच्छा, मीठबंदर रोड,
चेंदणी, ठाणे (पूर्व) - ४००६०३

कार्यालय : ०२२-२५३२६७३४ / ९७६९६०३२३९
ईमेल : amolmnale30@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft