ठाणे विभागीय केंद्रातर्फे 'विचारकुंकू' कार्यक्रम

महापौर मिनाक्षीताई शिंदे आणि सिनेअभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांची उपस्थिती



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र ठाणे आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने 'विचारकुंकू' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विचारकुंकू कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या कर्तत्ववान महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. मा. सौ. मिनाक्षीताई शिंदे, महापौर, ठाणे महानगरपालिका कार्यक्रमाच्या अध्यक्षा असतील. तर ज्येष्ठ सिनेअभिनेत्री अलका कुबल-आठल्ये या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहूण्या असतील. कार्यक्रमामध्ये अलका कुबल यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर घेतील. हा कार्यक्रम मंगळवारी १५ जानेवारीला सहयोग मंदीर सभागृह, पहिला मजला, घंटाळी, ठाणे येथे होईल. दिलीप दंड, विशाल लांजेकर, मुरलीधर नाले आणि अमोल नाले यांनी अधिक संख्येने लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

राजू परुळेकरांचे सत्याविरुध्दचे प्रचारयुग विषयावरवरती विध्यार्थ्यांना धडे

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विभागीय केंद्र ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने बा.ना बांदोडकर विज्ञान महाविद्यालय ठाणे येथे सत्याविरुद्धचे प्रचार या विषयावरती ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते.

कार्यक्रम महाविद्यालयात असल्याने विद्यार्थ्यांची अधिक उपस्थिती होती. विध्यार्थ्यांना कळेल आणि समजेल अशा उदाहरणे देऊन परुळेकरांनी व्याख्यानाला सुरुवात केली. एक असत्य बोलल्यावर किती असत्य बोलावं लागतं. हे उदाहरण त्यांनी सुरुवातीला दिल. त्यानंतर त्यांनी प्रत्येक क्षेत्रातील उदाहरणे दिली. हा संपूर्ण कार्यक्रम खालील लिंकवरती उपलब्ध आहे. https://www.facebook.com/ybchavanpratishthan/videos/2114104765570632/

   

विभागीय केंद्र - ठाणे

मा. श्री. मुरलीधर नाले
अध्यक्ष विभागीय केंद्र, ठाणे
मा. श्री. अमोल नाले, सचिव
१६, श्री सदिच्छा, मीठबंदर रोड,
चेंदणी, ठाणे (पूर्व) - ४००६०३

कार्यालय : ०२२-२५३२६७३४ / ९७६९६०३२३९
ईमेल : amolmnale30@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft