ज्येष्ठ नागरिक गौरव संध्या...

WhatsApp Image 2019 09 24 at 2.21.48 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र ठाणे आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक गौरव संध्या या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्कार सोहळ्यात डॉ. महेश चौधरी, भानुदास चव्हाण, महेश कोळी, एम. इस्माईल नेरेकर, सुरेंद्र दिघे आणि सुनिता केळकर या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असून सुमधूर हिंदी-मराठी गाण्याच्या कार्यक्रमासमवेत सत्कार सोहळा पार पडणार आहे. रविवार २९ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता सह्योग मंदिर हॉल, दुसरा मजला ठाणे (पश्चिम) येथे हा सोहळा संपन्न होईल. तरी वरील कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानमार्फत करण्यात आले आहे.  

शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार...

13 Shikhak Satkar Invitaion Corel Ver 13889

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विभागीय केंद्र ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम रविवार दिनांक ८ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता, मंगला हायस्कूल हॉल, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, ठाणे येथे होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त उपसचिव, नियोजन विभागाचे मुरलीधर नाले आणि संवादक सौ. धनश्री प्रधान-दामले या असतील. डॉ. शर्मिला पाटील, श्री. मंदार टिल्लू, श्री. संदीप पाटील, श्री. सचिन खैरनार, सौ. रुपाली कदम या शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. ठाणे विभागीय केंद्राचे अध्यक्ष मुरलीधर नाले, उपाध्यक्ष महेश केळुसकर आणि सचिव अमोल नाले यांनी कार्यक्रमाला अधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

   

विभागीय केंद्र - ठाणे

मा. श्री. मुरलीधर नाले
अध्यक्ष विभागीय केंद्र, ठाणे
मा. श्री. अमोल नाले, सचिव
१६, श्री सदिच्छा, मीठबंदर रोड,
चेंदणी, ठाणे (पूर्व) - ४००६०३

कार्यालय : ०२२-२५३२६७३४ / ९७६९६०३२३९
ईमेल : amolmnale30@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft