बोलीभाषा काळजातील भावना घेऊन येतेवक्तृत्व कलेत तिची जोपासना करा - डॉ.अनिता नेवसे जाधव

 यशवंत शब्दगौरव कोल्हापूर विभागीय फेरीचा गणेश लोळगे मानकरी !

WhatsApp Image 2019 08 29 at 9.52.13 PM

 दि.२९ (कोल्हापूर) : वेगवेगळ्या भागातून आपली बोली घेऊन आलेल्या आणि वक्तृत्वाची जोपासना करणाऱ्या विद्यार्थी स्पर्धकांनी आपली बोली सोडून शुद्ध भाषा बोलण्याच्या प्रयत्नात आपल्या मूळ भाषेचा गोडवा हरवू देऊ नये. वक्तृत्व कला तुम्हाला आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण वाढायला मदत करते.मी महाविद्यालयीन काळात वक्तृत्व स्पर्धांमधून सहभाग नोंदविला, आज मला न्यायधीश म्हणून न्यायदान करतांना त्या आकलनाचा मोठा उपयोग होतो,असे प्रतिपादन कोल्हापूर कौटुंबिक न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश डॉ.अनिता जाधव नेमसे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियान व महावीर महाविद्यालय,कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्याच्या पारितोषिक वितरण समारंभात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
कोल्हापूर विभागीय फेरीत कोल्हापूर,सांगली व सातारा जिल्ह्यातील ५० स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक - गणेश ज्ञानदेव लोळगे, अशोकराव माने महाविद्यालय, वाठार, द्वितीय क्रमांक - आलिशा अनिल मोहिते,

बदलापूर मध्ये मोफत श्रवणयंत्र वाटप पूर्वनावनोंदणी आणि तपासणी शिबीर

समाजात सध्या मोठ्या प्रमाणात दिव्यांग व्यक्ती आढळून येतात. पण महागडं कृत्रिम साहित्य वापरून आपलं दिव्यांगपण दूर करण्यात कुटूंबाला आणि दिव्यांगव्यक्तीला ब-याच समस्यांचा सामना करावा लागतो. या हेतूने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच, महात्मा गांधी सेवा संघ, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र पुणे आणि स्टार्की फाऊंडेशन, अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत श्रवणयंत्र वाटप पूर्व नाव नोंदणी आणि तपासणी पूर्ण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. टाटा ट्रस्ट, मुंबई, ठाकरसी ग्रुप मुंबई आणि एस. आर. व्ही. ट्रस्ट, मुंबई यांच्या विशेष सहकार्याने शनिवारी ६ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ८. ३० वाजता यशस्विनी भवन, अंबरनाथ-बदलापूर रोड, बेलवली, बदलापूर (पूर्व) येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजक कॅप्टन आशिष दामले यांनी अधिकाधिक दिव्यांगांनी शिबीरात नाव नोंदणी आणि तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.

   

विभागीय केंद्र - कोकण

मा. श्री. शेखर निकम
अध्यक्ष विभागीय केंद्र, कोंकण
श्री. अनिल नेवाळकर, कार्याध्यक्ष

द्वारा माध्यमिक महिला विद्यालय पाग-चिपळूण
झरी रोड, पोलिस स्टेशनच्या मागे, 
चिपळूण, जि. रत्नागिरी
कार्यालय : ०२३५२-२२२३१२
ईमेल : ycpratnagiri@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft