'शिक्षक दिन' कार्यक्रम संपन्न..

कोकण विभागीय केंद्र : 'गुरु' हा एक अर्थपूर्ण शब्द आहे. गुरु या संकल्पने संदर्भात महत्त्वपूर्ण प्रश्न संभवतो : गुरु कोणास म्हणावे ?
एखादी विद्या आचरणारा, त्या विद्येचे रहस्य विद्यार्थ्याला समजावून देणारा, ती विद्या आत्मसात होईपर्यंत त्या विद्यार्थ्याला सोबत देणारा, अधिकारी व्यक्ती म्हणजे गुरु, असे म्हणता येईल. त्याचे श्रेष्ठत्व आचारावर अधिष्ठित असते. ज्याने विद्येचे रहस्य जाणलेले असते व अनुभवलेले असते तोच करा गुरु होय.

'गुरु' ही संज्ञा परमार्थ क्षेत्रात अधिक रुढ आहे. या गुरुविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिनांक ५ सप्टेंबर 'शिक्षक दिना' चे औचित्य साधून दि. २४ सप्टेंबर २०१६ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, कोकण विभागीय केंद्र व वराडकर-बेलोसे महाविद्यालय, दापोली यांचे संयुक्त विद्यमाने वराडकर - बेलोसे महाविद्यालयाचे सभागृहात सकाळी ११.३० वा. कार्यक्रम संपन्न झाला.

शिक्षक दिन कार्यक्रम..

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, कोकण विभागीय केंद्र रत्नागिरी व वराडकर-बेलोसे महाविद्यालय, दापोली, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने 'शिक्षक दिन' कार्यक्रम दिनांक २४ सप्टेंबर २०१६ वराडकर-बेलोसे महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ११.३० वा. आयोजित करण्यात आला आहे. या शिक्षक दिनानिमित्त मा. श्री. धनंजय चितळे यांचे व्य़ाख्यान आयोजित केले असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रतिष्ठानच्या कोकण विभागीय समितीचे अध्यक्ष मा. श्री. राजाभाऊ लिमये भूषविणार आहेत.

   

विभागीय केंद्र - कोकण

मा. श्री. शेखर निकम
अध्यक्ष विभागीय केंद्र, कोंकण
श्री. अनिल नेवाळकर, कार्याध्यक्ष

द्वारा माध्यमिक महिला विद्यालय पाग-चिपळूण
झरी रोड, पोलिस स्टेशनच्या मागे, 
चिपळूण, जि. रत्नागिरी
कार्यालय : ०२३५२-२२२३१२
ईमेल : ycpratnagiri@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft