व्हय, मी सावित्रीबाई

कलर्स मराठी वाहिनीवर सादर झालेला कार्यक्रम

WhatsApp Image 2020 02 13 at 10.16.51 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र कोकण व नवनिर्माण विद्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ९.३० वाजता नवनिर्माण विद्यालय, रत्नागिरी येथे सुषमा देशपांडे लिखित व दिग्दर्शित व्हय, मी सावित्रीबाई सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरच्या चरित्रनाट्य दाखविले जाणार आहे. शिल्पा साने, शुभांगी भुजबळ या मान्यवर हि कलाकृती सादर करणार आहेत. 

कोकणातील विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वात भाषेचा गोडवा अधिक - शेखर निकम

महाड येथील लक्ष्मण कचरे रत्नागिरी विभागीय फेरीचा मानकरी

WhatsApp Image 2019 08 30 at 5.53.31 PM

दि.३० (चिपळूण) : वक्तृत्व कलेत भाषेचा वापर हा अतिशय महत्वाचा असतो. वाचन,चिंतन व संवादातून तुमची भाषेबद्दलची समज अधिक समृद्ध होत जाते. कोकणाला विचारवंत, लेखक, साहित्यिक,राजकीय वक्ते यांची मोठी परंपरा आहे आणि कोकणात बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेचाही एक वेगळा गोडवा आहे. तोच गोडवा आजच्या पिढीतील वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही कायम आहे असे मत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई - विभागीय केंद्र चिपळूण चे अध्यक्ष शेखर निकम यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियान व सह्याद्री शिक्षण संस्थेचे महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. चिपळून येथे शुक्रवार,दि. ३० ऑगस्ट २०१९ रोजी,सकाळी १० वा. मुख्य सभागृह,सह्याद्री शिक्षण संस्थेचे महिला विद्यालय, चिपळूण येथे विभागीय फेरी संपन्न झाली. याप्रसंगी निकम बोलत होते. या स्पर्धेत रायगड,रत्नागिरी व सिंधुदूर्ग या तीन जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेला परीक्षक म्हणून प्राचार्य डॉ. टी वाय. कांबळे व प्रा. महेश अचिंतलवार यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक - लक्ष्मण विठ्ठल कचरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड, जि. रायगड,

   

विभागीय केंद्र - कोकण

मा. श्री. शेखर निकम
अध्यक्ष विभागीय केंद्र, कोंकण
श्री. अनिल नेवाळकर, कार्याध्यक्ष

द्वारा माध्यमिक महिला विद्यालय पाग-चिपळूण
झरी रोड, पोलिस स्टेशनच्या मागे, 
चिपळूण, जि. रत्नागिरी
कार्यालय : ०२३५२-२२२३१२
ईमेल : ycpratnagiri@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft