महाराष्ट्र राज्य पर्यटन धोरण व पर्यटन प्रशिक्षण’ या विषयावर
शनिवारी विशेष परिसंवादाचे आयोजन

WhatsApp Image 2021 02 05 at 5.52.39 PM

औरंगाबाद: यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशन व महात्मा गांधी मिशन, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शनिवार, दि. 13 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ‘महाराष्ट्र राज्य पर्यटन धोरण व कृषी पर्यटन प्रशिक्षण’ या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. एमजीएम परिसरातील आईनस्टाईन सभागृह, जेएनईसी महाविद्यालय येथे सदरिल कार्यक्रम संपन्न होईल. सदर परिसंवादास मा. डॉ. श्रीमंत हरकर, उपसंचालक, पर्यटन संचालनालय व मा. मनोज हाडवळे, कृषी पर्यटन प्रशिक्षक, महाराष्ट्र राज्य हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. इतिहासाच्या व नाविन्याच्या शोधात पर्यटक हजारो किलोमीटरचा प्रवास करून ऐतिहासीक व पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी येतात. कोविड काळानंतर पर्यटन क्षेत्र विस्ताराच्या संधी नेमक्या कशा उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे नुकतेच जाहिर करण्यातआलेल्या पर्यटन धोरण नेमके काय आहे? तसेच राज्यशासनाने जाहिर केलेल्या कृषी पर्यटन धोरणात नेमक्या काय बाबी आहेत, त्याचा अंमलबजावणी पातळीवर कसा उपयोग करून घेता येईल, या सर्व मुद्दांचा उहापोह या विशेष परिसंवादात करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून पर्यावरण संवर्धनातील व्यक्ती, टुरिस्ट गाईड, होम स्टे चालक, कृषी पर्यटन केंद्राचे संचालक, टुर ऑपरेटर, पत्रकार, विद्यार्थी अशा पर्यटनाशी निगडीत विविध व्यक्तिंनी या परिसंवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे सुनीत कोठारी, जसवंत सिंग, विभागीय केंद्राचे कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत, कार्यकारिणी सदस्य डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. अजीत दळवी, डॉ. श्रीरंग देशपांडे, डॉ. मुस्तजीब खान, डॉ. अपर्णा कक्कड, सुनील किर्दक, प्रा. दासू वैद्य, विजय कान्हेकर, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडूलकर, सुबोध जाधव, रेणुका कड आदींनी केले आहे.

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त
चित्रपट चावडीत दाखविणार ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’

1 29 2021 9 19 34 AM

औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय संचलीत एमजीएम फिल्म आर्ट्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रपट चावडी उपक्रमाअंतर्गत शनिवार, दि. 30 जानेवारी 2021 रोजी, सायं 6 वाजता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ हा चित्रपट चित्रपती व्ही. शांताराम प्रेक्षागृह, एमजीएम फिल्म आर्ट विभाग, एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय, औरंगाबाद येथे दाखविण्यात येणार आहे. कोरोना काळानंतर हा पहिलाच चावडीचा उपक्रम आहे.

‘मेकिंग ऑफ द महात्मा’ हा चित्रपट 1996 मधील संयुक्त भारत-दक्षिण आफ्रिका निर्मित असून, श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला आहे. महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतील सुरुवातीच्या काळातील जीवनावर आधारलेला हा चित्रपट असून फातिमा मीर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे. तसेच त्यांच्या ‘द अ‍ॅप्रेंटिसशिप ऑफ ए महात्मा’ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाला इंग्रजीतील सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिलालेला आहे. चित्रपटात रजत कपूर,पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राजीत कपूर यांना याचित्रपटातील भूमिकेकरिता सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविलेले आहे. चित्रपट सर्वांसाठी खुला असून चित्रपट रसिकांनी या चित्रपटाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत, कार्यकारिणी सदस्य डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. अजीत दळवी, डॉ. श्रीरंग देशपांडे, बिजली देशमुख, डॉ. मुस्तजीब खान, डॉ. अपर्णा कक्कड, सुनील किर्दक, प्रा. दासू वैद्य, विजय कान्हेकर, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडूलकर, एमजीएम फिल्म आर्ट विभाग प्रमुख शिव कदम, सुबोध जाधव आदींनी केले आहे.

   

विभागीय केंद्र - औरंगाबाद

मा. अंकुशराव कदम

अध्यक्ष विभागीय केंद्र, औरंगाबाद
श्री. सचिन मुळे,  कोषाध्यक्ष
श्री. नीलेश राऊत,  सचिव
निर्मिक-अभुदय, कासलीवालस सुवर्णयोग, 
व्यंक्टेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड,
गारखेडा परिसर, 
औरंगाबाद - ४३१००५
कार्यालय : ०२४०-२३७६२२१ / ९८९०५४२४४९
ईमेल : raut.nc@gmail.com, 
Jadhav.subodh63@gmail.com 

   

वृत्तपत्रीय दखल (औरंगाबाद)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft