"बी. रघुनाथ युवा काव्यसंध्या" फेसबुक लाईव्हवर...

WhatsApp Image 2021 09 04 at 7.42.08 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद व नाथ ग्रुप आयोजित मराठवाड्याचे भूषण ज्येष्ठ कवी दिवंगत बी. रघुनाथ यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित "बी. रघुनाथ युवा काव्यसंध्या" मंगळवार, ७ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता. फेसबुक लाईव्हवर.. प्रमुख उपस्थिती नंदकिशोरजी कागलीवाला सहभागी कवी सुहासिनी देशमुख, भैरवी चितळे, अनंत राऊत, नितिन जाधव, संतोष गायकवाड, अपूर्व राजपूत, डॉ. स्वप्नील चौधरी.

'पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दिशेने' 
व्याख्यानाचे आयोजन !

WhatsApp Image 2021 09 02 at 4.05.53 PM

दि.२ (औरंगाबाद) : महाराष्ट्रात आता गणेशोत्सवाची चाहूल लागलेली आहे,पुढील आठवड्यापासून गणपती उत्सव राज्यभरात साजरा व्हायला सुरुवात होईल.मागील दोन वर्षांपासून कोविड निर्बंधांचे पालन करीत गणेशोत्सव सध्या पद्धतीने साजरा होत आहे.पण पुढील काळात साध्या पद्धतीबरोबरच पर्यावरणपूरक गणेशोत्सव आपल्याला कसा साजरा करता येईल ? गणेश मूर्ती पासून सजावटीच्या सामानापर्यंत आपल्या त्यांच्या निवडीमध्ये पर्यावरणाचे भान कसे राखता येईल ? या सर्व प्रश्नांच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद यांच्या वतीने विशेष संवाद सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.

औरंगाबाद येथील दिपशिखा फाउंडेशनच्या अध्यक्षा व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्नरत असलेल्या पर्यावरणप्रेमी मनीषा चौधरी उपरोक्त विषयावर ऑनलाईन संवाद साधणार आहेत.शनिवार दि.४ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी सहा वाजता संपन्न होईल.प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवरून (www.facebook.com/ycp100) कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल.नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम,सल्लागार नंदकिशोर कागलीवाल, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत,सदस्य डॉ.भालचंद्र कांगो,प्रा.अजीत दळवी,डॉ.श्रीरंग देशपांडे,डॉ.अपर्णा कक्कड,दासू वैद्य,डॉ.मुस्तजीब खान,डॉ.रेखा शेळके,विजय कान्हेकर,सुहास तेंडुलकर,सुनील किर्दक,रेणुका कड,सुबोध जाधव आदींनी केले आहे.

   

विभागीय केंद्र - औरंगाबाद

मा. अंकुशराव कदम

अध्यक्ष विभागीय केंद्र, औरंगाबाद
श्री. सचिन मुळे,  कोषाध्यक्ष
श्री. नीलेश राऊत,  सचिव
निर्मिक-अभुदय, कासलीवालस सुवर्णयोग, 
व्यंक्टेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड,
गारखेडा परिसर, 
औरंगाबाद - ४३१००५
कार्यालय : ०२४०-२३७६२२१ / ९८९०५४२४४९
ईमेल : raut.nc@gmail.com, 
Jadhav.subodh63@gmail.com 

   

वृत्तपत्रीय दखल (औरंगाबाद)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft