बाल दिनानिमित्त सायबर सुरक्षा आणि बाल विश्व
याविषयावर जाणीवजागृती कार्यक्रम

77027916 2777887968945848 6947775046332973056 n

विकास अध्ययन केंद्र आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र औरंगाबाद यांच्यावतीने नॅशनल उर्दू हायस्कूल, जोगेश्वरी, मराठा हायस्कूल, चौराहा, श्री सरस्वती भुवन प्रशाळा, वेनुताई चव्हाण हायस्कूल, एमजीएम संस्कार विद्यालय आणि शारदा मंदिर कन्या शाळा येथे बाल दिनानिमित्त इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत सायबर सुरक्षा आणि बाल विश्व याविषयावर आठवडाभर जाणीवजागृती कार्यक्रम घेण्यात आला. मूल सोशल मीडिया कोणता वापरतात हे जाणून घेतले. तेव्हा टिकटॉक वापरणारे मुले सगळ्यात जास्त होती. बरेच विद्यार्थी फेसबुक आणि टिकटॉकचे युजर्स आहेत. फेसबुक फ्रेंडस किती आहेत हे जाणून घेतले असता १०००ते १२०० चा आकडा मुलांनी सांगितला. आपल्या देशात सायबर पॉलिसी आहे का?, कायदा कोणता आहे? असे प्रश्न मुलांनी विचारले. मोबाइल आणि इंटरनेटच्या वापराने मुलांचे ज्ञान अफाट आहे, अशी माहिती रेनूका कड यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या की, मुलांमध्ये टिकटॉकचा वापर जास्त प्रमाणात आहे. १५ दिवसांत एकूण ३००व्हिडिओ मुलांकडून टाकले जातात. एका दिवसात ही मूल जवळपास २०व्हिडिओ शेयर करतात. टिकटॉक विडिओला जास्तीत जास्त लाईक्स मिळविण्यासाठी ही मूल अनेक उपाय करतात.
https://www.facebook.com/375548895986762/posts/1266821010192875/

ग्रामीण भारताचा नवा चेहरा : ग्रामसंस्कृती पर्यटन विषयावर व्याख्यान...


WhatsApp Image 2019 11 24 at 11.26.04 AM

ग्रामीण भारताचा नवा चेहरा : ग्रामसंस्कृती पर्यटन विषयावर व्याख्यान...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, औरंगाबाद व एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या ३५ वी पुण्यतिथीनिमित्त सोमवार २५ नोव्हेंबर २०१९ सकाळी ११ वा. ग्रामीण भारताचा नवा चेहरा : ग्रामसंस्कृती पर्यटन या विषयावर मनोज हाडवळे ( लेखक व कृषी पर्यटन तज्ज्ञ, पुणे ) हे व्याख्याते असून आईनस्टाईन सभागृह, जेएनईसी महाविद्यालय, एमजीएण परिसर, औरंगाबाद येथे होणार आहे.

   

विभागीय केंद्र - औरंगाबाद

मा. अंकुशराव कदम

अध्यक्ष विभागीय केंद्र, औरंगाबाद
श्री. सचिन मुळे,  कोषाध्यक्ष
श्री. नीलेश राऊत,  सचिव
निर्मिक-अभुदय, कासलीवालस सुवर्णयोग, 
व्यंक्टेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड,
गारखेडा परिसर, 
औरंगाबाद - ४३१००५
कार्यालय : ०२४०-२३७६२२१ / ९८९०५४२४४९
ईमेल : raut.nc@gmail.com, 
Jadhav.subodh63@gmail.com 

   

वृत्तपत्रीय दखल (औरंगाबाद)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft