महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त
चित्रपट चावडीत दाखविणार ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’

1 29 2021 9 19 34 AM

औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय संचलीत एमजीएम फिल्म आर्ट्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रपट चावडी उपक्रमाअंतर्गत शनिवार, दि. 30 जानेवारी 2021 रोजी, सायं 6 वाजता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ हा चित्रपट चित्रपती व्ही. शांताराम प्रेक्षागृह, एमजीएम फिल्म आर्ट विभाग, एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय, औरंगाबाद येथे दाखविण्यात येणार आहे. कोरोना काळानंतर हा पहिलाच चावडीचा उपक्रम आहे.

‘मेकिंग ऑफ द महात्मा’ हा चित्रपट 1996 मधील संयुक्त भारत-दक्षिण आफ्रिका निर्मित असून, श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला आहे. महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतील सुरुवातीच्या काळातील जीवनावर आधारलेला हा चित्रपट असून फातिमा मीर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे. तसेच त्यांच्या ‘द अ‍ॅप्रेंटिसशिप ऑफ ए महात्मा’ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाला इंग्रजीतील सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिलालेला आहे. चित्रपटात रजत कपूर,पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राजीत कपूर यांना याचित्रपटातील भूमिकेकरिता सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविलेले आहे. चित्रपट सर्वांसाठी खुला असून चित्रपट रसिकांनी या चित्रपटाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत, कार्यकारिणी सदस्य डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. अजीत दळवी, डॉ. श्रीरंग देशपांडे, बिजली देशमुख, डॉ. मुस्तजीब खान, डॉ. अपर्णा कक्कड, सुनील किर्दक, प्रा. दासू वैद्य, विजय कान्हेकर, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडूलकर, एमजीएम फिल्म आर्ट विभाग प्रमुख शिव कदम, सुबोध जाधव आदींनी केले आहे.

बिहार निवडणूक निकालांचे खरे 'मॅन ऑफ दि मॅच' तेजस्वी यादव !
राजकीय विश्लेषक भाऊसाहेब आजबे यांचे प्रतिपादन

WhatsApp Image 2020 11 25 at 5.52.01 PM 1

औरंगाबाद दि २५ : नितीशकुमार हे बिहारचे मुख्यमंत्री बनले असले तरी तेथील मुख्य लाभार्थी भाजपच आहे. लॉकडाऊनच्या काळात आर्थिक स्थिती, मजुरांची हेळसांड यासारख्या विपरित परिस्थिती असतानाही लोकांनी भाजपला मत देणे ही पक्षासाठी आत्मविश्वास वाढवणारी बाब आहे. मात्र, भाजपला बिहारमध्ये नरेंद्र मोदींना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असल्यासारखे प्रतिबिंबीत करण्यात आले. त्यामुळे नितीशकुमारांना नव्हे तर मोदींनाच जिंकून दिल्यासारखे हे चित्र बनले. दुसरीकडे, दिशादर्शक आश्वासने देण्याच्या बाबतीत मात्र नितीशकुमार किंवा मोदींच्या तुलनेत तेजस्वी यादवनेच बाजी मारली. एका अर्थाने तेजस्वी येथील मॅन ऑफ द मॅच ठरले आहेत असे मत राजकीय विश्लेषक भाऊसाहेब आजबे यांनी व्यक्त केले.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई- विभागीय केंद्र औरंगाबाद विभाग आणि एमजीएम वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालय यांच्या वतीने 'बिहार निवडणुकीचा अन्वयार्थ' या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष अंकुशराव कदम होते. या वेळी विश्वस्त प्रतापराव बोराडे, उद्योजक सुनील किर्दक, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडूलकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

पुढे बोलतांना आजबे म्हणाले की,एमआयएमने जिंकलेल्या ५ जागा केवळ १५ दिवसांच्या प्रचारामुळे नव्हे तर पुरावेळी त्यांनी केलेल्या कामामुळे जिंकल्या आहेत. या विजयाचा त्यांना पश्चिम बंगालच्रा निवडणुकीत लाभ होऊ शकतो. मात्र, एमआयएमचा विजय चिंतेचा विषय असून सेक्युलर पक्षांपुढील आव्हान आहे.यावेळी आजबे यांनी बिहार निवडणूक निकालांचे व सर्व पक्षांच्या भूमिकांचे विस्तृत विवेचन केले,उपस्थितांनी यावेळी प्रश्न विचारले.याप्रसंगी एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, ज्येष्ठ विश्लेषक जयदेव डोळे, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर, निरंजन टकले, प्रा.एच.एम.देसरडा,सुबोध जाधव,रेणुका कड,निखिल भालेराव,आशा देशपांडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहास तेंडूलकर यांनी केले. सुत्रसंचलन महेश अचिंतलवार यांनी तर आभार शिव कदम यांनी मानले.

बैजू पाटील यांचा विशेष सत्कार

नॅशनल जिओग्राफीकडून आऊटस्टँडींग फोटोग्राफर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल छायाचित्रकार बैजू पाटील यांचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने अंकुशराव कदम यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. "अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये घेतलेल्या कष्टाचे या पुरस्काराच्या रुपाने चीज झाले. मागील २५ वर्षे आपण प्रत्येक छायाचित्रासाठी तितकीच मेहनत घेत आहोत आणि त्या मेहनतीचे फळ मिळत असल्याचे समाधान आहे,' अशी भावना बैजू पाटील यांनी या वेळी व्यक्त केली.

   

विभागीय केंद्र - औरंगाबाद

मा. अंकुशराव कदम

अध्यक्ष विभागीय केंद्र, औरंगाबाद
श्री. सचिन मुळे,  कोषाध्यक्ष
श्री. नीलेश राऊत,  सचिव
निर्मिक-अभुदय, कासलीवालस सुवर्णयोग, 
व्यंक्टेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड,
गारखेडा परिसर, 
औरंगाबाद - ४३१००५
कार्यालय : ०२४०-२३७६२२१ / ९८९०५४२४४९
ईमेल : raut.nc@gmail.com, 
Jadhav.subodh63@gmail.com 

   

वृत्तपत्रीय दखल (औरंगाबाद)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft