कोरोना काळात देशांतर्गत पर्यटनाला चालना मिळणे गरजेचे

औरंगाबाद पर्यटन क्षेत्र : आव्हाने व बदललेले जग' विषयावरील परिसंवाद मान्यवरांचे मत

9 15 2020 7 07 37 PM

औरंगाबाद, दि. 13: कोरोना संकट, लॉकडाऊनचा मोठा परिणाम पर्यटन क्षेत्रावर झाला. या संकटातून बाहेर पडतांना आंतरराष्ट्रीय पर्यटनावर विसंबून न राहता देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्याची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद, अमेझिंग औरंगाबाद ग्रुप व अभ्युदय फाउंडेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ' औरंगाबाद पर्यटन क्षेत्र : आव्हाने व बदललेले जग' या विषयावर विशेष ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन रविवारी(ता. 13 सप्टेंबर) करण्यात आले होते. या परिसंवादात हरप्रितसिंग (अध्यक्ष, औरंगाबाद हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशन), सुनीत कोठारी (उद्योजक व औरंगाबाद हवाई व पर्यटन क्षेत्रांचे तज्ञ) , जसवंतसिंग (अध्यक्ष,औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन), प्रा.बीना सेंगर (इतिहास विभाग,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) हे मान्यवर सहभागी झाले होते.

कोरोना संकट, लॉकडाऊनमुळे पर्यटन क्षेत्रापुढे मोठे आव्हान उभे राहीले आहे. औरंगाबादच्या पर्यटन क्षेत्राविषयी बोलतांना सुनीत कोठारी म्हणाले की, पर्यटन क्षेत्राला आव्हाने नवीन नाहीत. प्रत्येक आव्हानावर आम्ही मात केली आहे. त्यामुळे कोरोना संकटातूनही पर्यटन क्षेत्र पूर्ण ताकदीनिशी बाहेर येईल याबाबत आम्ही आशावादी आहोत. आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्षभरासाठी तरी बंदच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात देशांतर्गत पर्यटनाला चालना देणे गरजेचे आहे. त्यासाठी हवाई वाहतूक, रस्त्यांतर्गत वाहतून करतांना प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक ती काळजी घ्यायला हवी. हॉटेल्समध्येही सुरक्षिततेसंदर्भात योग्य ती काळजी घेतली जात आहे. पण पर्यटकांना आपल्या सुरक्षिततेची हमी मिळावी यासाठी या सर्व सोयी सुविधांचा प्रचार, प्रसार होणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक माध्यमांचा वापर प्रभावीपणे केला जावा. आंतरजिल्हा पर्यटन, आंतरराज्य पर्यटनाला चालना मिळायला हवी. दुर्लक्षित अशा चांगल्या पर्यटनस्थळांना उजेडात आणण्याची ही उत्तम संधी आहे. या पर्यटनस्थळांच्या प्रचार प्रसारासाठी सोशल मिडीयाचा वापर करायला व्हावा. पर्यटकांना आकर्षिक करणार्या योजनांचा विचार करायला हवा. हेरिटेज वॉक, कृषी पर्यटन, फोटोग्राफी, टुरिजम क्विजेस अशा माध्यमांतून पर्यटकांना आकर्षित केले जाऊ शकते.

जसवंत सिंग म्हणाले की, पर्यटन क्षेत्राला कोरोना संकटातून बाहेर येण्यासाठी आणखी एक वर्ष लागण्याची शक्यता आहे. औरंगाबादमध्ये अंजिठा, वेरूळ ही आंतरराष्ट्रीय ख्यातीची पर्यटनस्थळे आहेत. यासोबतच शहरात आणि जिल्ह्यात असलेल्या अनेक पर्यटनस्थळांचाही प्रचार, प्रसार होणे, पर्यटन क्षेत्र वाढण्यासाठी शासन, प्रशासन, संबंधित संस्था, संघटनांच्या माध्यमातून एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे ते म्हणाले.

हॉटेल उद्योगाबाबत बोलतांना हरप्रितसिंग म्हणाले की, मागील पाच ते सहा महिने हॉटेल व्यवसाय बंद राहीला आहे. अद्याप हॉटेल्स सुरू झालेले नाहीत. या व्यवसायात भांडवलाची मोठी गुंतवणूक होते. त्यामुळे लॉकडाऊनचा मोठा फटका या व्यवसायाला बसला आहे. पुन्हा नव्याने सुरवात करणे ही सुद्धा एक खर्चिक बाब असणार आहे. हॉटेल्स बंद असतांना शासनाने कर माफ करण्याची विनंती आम्ही केली आहे. अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. या व्यवसायाशी संबंधित अनेक उद्योग सध्या ठप्प झाले आहेत. तर अनेक उद्योग बंद झाले आहेत. या आव्हानात्मक परिस्थितीतूनही बाहेर पडू याबाबत मी आशावादी आहे. औरंगाबादला पर्यटनाची राजधानी म्हटले जाते, पण तशा प्रकारच्या सोयी सुविधाही येथे उपलब्ध झाल्या, तर याचा नक्कीच फायदा होईल.

प्रा. बिना सेंगर म्हणाल्या की, औरंगाबादकडे पर्यटक आकर्षित व्हावा यासाठी संशोधनात्मक कार्यक्रमांची गरज आहे.

परिसंवादाचे प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे सचिव नीलेश राऊत यांनी केले. पत्रकार संकेत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुबोध जाधव,निखिल भालेराव,ऍड.स्वप्नील जोशी,मंगेश निरंतर,श्रीकांत देशपांडे,दीपक जाधव यांनी परिश्रम घेतले.

'औरंगाबाद पर्यटन क्षेत्र : आव्हाने व बदललेले जग '
या विषयावर परिसंवादाचे आयोजन

WhatsApp Image 2020 09 10 at 1.17.48 PM

(औरंगाबाद) : कोरोनाच्या विळख्यात सापडल्यानंतर जगात अनेक क्षेत्रांना त्याचा जबर तडाखा बसला आहे,यात प्रामुख्याने पर्यटन क्षेत्र समाविष्ट आहे.औरंगाबाद जिल्हा हा महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे.दरवर्षी लाखो पर्यटक विविध देशांतून व राज्यातून पर्यटनासाठी औरंगाबादला येत असतात.हे सर्व मागील सहा महिन्यांपासून बंद झाले आहे.त्याचा मोठा फटका औरंगाबाद पर्यटनावर आधारित विविध घटकांना बसला आहे.या सर्व विषयाचा ऊहापोह करण्यासाठी व पुढील काळात अजून काय आव्हाने असतील,त्यावर उपाय काय असू शकतात ? या प्रश्नांवर विनिमय करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद, अमेझिंग औरंगाबाद ग्रुप व अभ्युदय फाउंडेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ' औरंगाबाद पर्यटन क्षेत्र : आव्हाने व बदललेले जग' या विषयावर विशेष ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. रविवार दि १३ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता सदरील परिसंवाद संपन्न होईल. झूम द्वारे हा परिसंवाद संपन्न होणार असून,याचे थेट प्रक्षेपण प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवर (www.facebook.com/ycp100) करण्यात येणार आहे.या परिसंवादात पर्यटन क्षेत्रातील विविध मान्यवर सहभागी होणार आहेत त्यात मा. हरप्रितसिंग (अध्यक्ष,औरंगाबाद हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशन), मा. सुनीत कोठारी (उद्योजक व औरंगाबाद हवाई व पर्यटन क्षेत्रांचे तज्ञ) , मा.जसवंतसिंग (अध्यक्ष,औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन), मा. प्रा.बीना सेंगर (इतिहास विभाग,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) यांचा समावेश असणार आहे.या संवादाचे संचलन पत्रकार संकेत कुलकर्णी हे करतील.
तरी,जास्तीत जास्त नागरिकांनी या ऑनलाईन परिसंवादात सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम,सल्लागार नंदकिशोर कागलीवाल,कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत,सदस्य प्रा.अजीत दळवी,डॉ.भालचंद्र कांगो,डॉ.श्रीरंग देशपांडे,डॉ.दासू वैद्य,डॉ.मुस्तजीब खान,डॉ.अपर्णा कक्कड,डॉ.रेखा शेळके,रेणुका कड,सुहास तेंडुलकर,सुबोध जाधव,ऍड.स्वप्नील जोशी,निखिल भालेराव,मंगेश निरंतर आदींनी केले आहे.

   

विभागीय केंद्र - औरंगाबाद

मा. अंकुशराव कदम

अध्यक्ष विभागीय केंद्र, औरंगाबाद
श्री. सचिन मुळे,  कोषाध्यक्ष
श्री. नीलेश राऊत,  सचिव
निर्मिक-अभुदय, कासलीवालस सुवर्णयोग, 
व्यंक्टेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड,
गारखेडा परिसर, 
औरंगाबाद - ४३१००५
कार्यालय : ०२४०-२३७६२२१ / ९८९०५४२४४९
ईमेल : raut.nc@gmail.com, 
Jadhav.subodh63@gmail.com 

   

वृत्तपत्रीय दखल (औरंगाबाद)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft