शेतकरी कंपन्यांच्या सक्षमीकरणाकरीता दि. १६ जुलै रोजी सीटा संवाद कार्यक्रमाचे आयोजन
अहमदनगर : सीटा (सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रेड इन अॅग्रीकल्चर अॅण्ड अॅग्रोबेस्ड इंडस्ट्रिज), यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी कंपन्या वा फार्मर प्रोड्युसर कंपन्या आणि शेतमालाचे ठोक खरेदीदार यांच्यासाठी इ-कॉमर्स प्लॅटफार्मची निर्मिती, शेतकरी कंपन्यांचा सक्षमीकरण या विषयावर सीटा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोमवारी १६ जुलै २०१८ रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत सदरील कार्यक्रम कृषी महाविद्यालय सोनई येथे होणार आहे.
Read more: शेतकरी कंपन्यांच्या सक्षमीकरणाकरीता दि. १६ जुलै रोजी सीटा संवाद कार्यक्रमाचे आयोजन
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरास सुरूवात
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र अमहदनगर आणि कृषी महाविद्यालय सोनाई यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरास सुरूवात करून जयंती साजरी केली.