विधी साक्षरता कार्यशाळा संपन्न..

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कायदेविषयक सहाय्य सल्ला व फोरम, मुंबई व स्वयम फाऊंडेशन भायखळा, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सामान्य लोकांसाठी (महिला व पुरुष ) रविवार दिनांक २८ ऑगस्ट २०१६ रोजी महापालिका शाळा, सून डॉक जवळ, कुलाबा, मुंबई ४००००५ येथे एक दिवशीय ( सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत) विधी साक्षरता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अंदाजे ७० लोक (महिला व पुरुष) कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते. पाच व्याख्याने झाली. एक व्याख्यान हिंदीमध्ये व चार व्याख्याने मराठी मध्ये झाली. खालील दर्शविलेल्या वक्त्यांनी त्याच्या नावासमोर दर्शविलेल्या कायद्यासंबंधी माहिती दिली.

१. विधी सेवा प्राधिकरण अधिनियम १९८७ हुंडा बंदी अधिनियम १९६१ - श्री. म. बा. पवार
२. भारतीय सविधान - प्रमोद ठोकळे
३. माहितीचा अधिकार कायदा २००५ - श्रीमती प्रितिदर सिंग
४. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिंक छळापासून संरक्षण कायदा २०१३ - अॅड. श्री. अजय केतकर
५. पोलिस स्टेशनचे कामकाज व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ - अॅड. निलेश पावसकर

कार्यक्रम सकाळी १० वाजता सुरु झाला. प्रथम श्री. उज्जवल जाधव यांनी सर्वाचे स्वागत केले त्यानंतर श्री. एम. बी. पवार यांनी प्रस्ताविक कामकाज संबंधी माहिती सांगितली. नंतर सविधाना प्रास्ताविकाचे सांघिक वाचन करण्यात आले. त्यानंतर अविवाहित मुले व मुलीनी हुंडा न घेण्याबाबत शपथा घेतल्या.

दुपारी २.३० वाजता दुस-या सत्राचे काम सुरु झाले. दुस-या सत्राच्या प्रारभी सविधानातील मुलभूत कर्तव्य पालना संबंधी सर्वांनी शपथा घेतल्या. शेवटी समारोप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दोन महिलां व दोन पुरुषांनी आयोजनाच्या कार्यक्रमाबाबत प्रतिक्रिया दिली. त्यानंतर सर्वांना प्रमाणपत्रे वाटण्यात आली. श्री. उज्ज्वल जाधव यांनी आभार प्रदर्शित केले.

   

विधी सल्लागार व सदस्य सचिव  

श्री. म. बा. पवार
विधी सल्लागार व सदस्य सचिव,
कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम,
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- ०२२-२२०२८५९८ / ०२२-२२८५२०८१


   

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft