हवामान बदलविषयक विद्यार्थ्यांची परिषद संपन्न...


दिनांक १९ डिसेंबर २०१६ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे हवामान बदलविषयक विद्यार्थ्यांची परिषद यशस्वीरीत्या पार पडली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि सृष्टीज्ञान संस्था तसेच स्वीडनमधील क्लायमेट अक्शन संस्थेच्या सहयोगाने आयोजित या परिषदेमध्ये मुंबईतील शाळांचे २०० विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. बदलत्या हवामानाची दखल घेत आपापल्या पातळीवर पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम शाळांमध्ये आयोजित केले जात आहेत. या परिषदेमध्ये स्वीडनच्या क्लायमेट अक्शन संस्थेच्या वतीने श्रीमती कारिन वाहल्ग्रेन आणि श्री. रिकार्ड रेनबर्ग तसेच प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष , सुप्रियाताई सुळे यांनी मार्गदर्शन केले. पर्यावरण संवर्धनाचे हे, उपक्रम मुंबई – ठाणे – पुणे – बारामती अशा प्रमुख भागांमधील शाळांमध्ये राबविले गेल्यास हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीला आळा घालण्याच्या दिशेने खूप मोठ्या प्रमाणात वातावरणाची निर्मिती होऊ शकेल असे प्रतिपादन सुप्रियाताईंनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. कार्यक्रमाचे आयोजन श्री. प्रशांत शिंदे , कुनाल अणेराव , श्रीमती. ज्योती खोपकर यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती. संगीता खरात यांनी केले.तर आभार युवाराज प्रतिष्ठानचे कॅप्तन आशिष दामले यांनी केले.

  वसुंधरा पर्यावरण संवर्धन अभियान

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे 'वसुंधरा पर्यावरण संवर्धन अभियान' हे पर्यावरण संवर्धन आणि शिक्षणासाठी उभारलेले व्यासपीठ आहे. खासदार सौ. सुप्रिया सुळे अभियानाच्या निमंत्रक आहेत. हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीची समस्या आज संपूर्ण जगाला भेडसावत आहे. त्यांच्या दुष्परिणामांना मुंबईलाही सामोरे जावे लागणार आहे म्हणून हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीची समस्या नीट समजून घेण्यासाठी आणि त्यांचा एकूणच पर्यावरण व मानवी जीवनावर होणारा परिणाम याबद्दल शालेय विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने हवामान बदल विषयक शिक्षण व कृती प्रकल्पाची आखणी करण्यात आली होती. या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांबरोबर स्थानिक पातळीवरील पर्यावरणीय उपाययोजना करण्याकरिता विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांची तयारी करून घेणे, स्थानिक प्रजातींच्या वनस्पतींचे संवर्धन करणे, वीज पाण्याच्या अपव्ययाचे ऑडीट करणे, देशी बियाण्यांची बॅंक स्थापन करणे, टाकाऊ कागदापासून नवा कागद निर्माण करणे, स्थानिक बाग, जंगल, सागरकिनारा अशा नैसर्गिक स्थळांच्या क्षेत्रभेटी आयोजित करणे, यासारखे विविध कृतीशील उपक्रम वर्षभर राबविण्यात येतात.

   

वसुंधरा कक्ष  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft