वसुंधरा पर्यावरण संवर्धन अभियानातर्फे
कांदिवली येथे 'हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ' पहिले सत्र संपन्न..यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या वसुंधरा पर्यावरण संवर्धन अभियानतर्फे शाळांमध्ये मुलांचे हवामान अध्ययन केंद्र हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. गेली पाच वर्षे सुप्रियाताई सुळे या वसुंधरा अभियानमार्फत शाळा-शाळांमध्ये पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बद्दल याविषयी जनजागृतीचे काम करीत आहेत. मुलांचे हवामान अध्ययन केंद्र प्रकल्प हा याच कामाचा पुढील टप्पा आहे. 

महाराष्ट्राच्या बदलत्या तापमानाला आणि हवामानातील बदलांना सामोरे जाण्याचे आव्हान भविष्यात येणा-या पिढीला पेलता येण्यासाठी अशा प्रकारच्या अनेक शैक्षणिक उपक्रमांची आवश्यकता आहे. महाराष्ट्राचे भवितव्य घडविणारी भावी पिढी येणा-या पर्यावरणीय आपत्तीला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी आशा उपक्रमातून तयार व्हावी हे या प्रकल्पाचे अंतिम ध्येय आहे. 
या प्रकल्पाअंतर्गत कांदिवली येथे आज पहिले सत्र घेण्यात आले. या सत्रात हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ म्हणजे काय हे ३० विद्यार्थिनींना स्लाईड शोच्या माध्यमातून समजावून देण्यात आले. 

   

वसुंधरा कक्ष  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft