राज्यस्तरीय पारितोषिकासाठी आवाहन...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक महाराष्ट्रातील व्यक्ती किंवा संस्थेस देण्यात येते. २०१९ या वर्षांसाठी कृषि-औद्योगिक समाज रचना व्यवस्थापन, प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान-तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, मराठी साहित्य व संस्कृति या क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये भरीव आणि पथदर्शी कार्य करणा-या व्यक्ती किंवा संस्थेस पारितोषिक देण्यात येणार आहे. दोन लाख रोख रक्कम व मानपत्र असे त्याचे स्वरुप आहे. याकरिता ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. नियमावलीसाठी संपर्क : ०२२-२२०४३६१९ पत्ता : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०००२१.

यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार सोहळा
यंदाचा पुरस्कार पद्मविभूषण डॉ. शास्त्रज्ञ मनमोहन शर्मा यांना...


राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची १०५ वी जयंती १२ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये साजरी करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे समारंभाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. तर या कार्यक्रमात ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार - २०१७’ हा पद्मविभूषण डॉ. मनमोहन शर्मा यांना प्रदान करण्यात येणार आहे.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft