यशवंत युवा फेलोशिप

घसरलेली शैक्षणिक गुणवत्ता, अपु-या शैक्षणिक सोयीसुविधा, शाळा गळतीचे वाढते प्रमाण, विद्यार्थी आत्महत्या, व्यावसायिक कौशल्यांचा अभाव, वाढती बेरोजगारी, ढासळलेले शारीरिक व मानसिक आरोग्य, अपु-या आरोग्य सुविधा, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला न मिळणारा भाव, वाढती रासायनिक शेती, नष्ट होत चाललेली जैवविविधता, वाढते तापमान, पाणी व विजेचा अनावश्यक वापर, वाढती व्यसनाधीनता, जातीयता अशा एक ना अनेक समस्या आज आ वासून उभ्या आहेत. सध्या या समस्यांना अनेक सामाजिक संस्था, संघटना आपापल्या परीने उत्तरे शोधत आहेत. या संस्था संघटनांबरोबरच काही नव्या दमाचे युवक देखील स्पर्धात्मक जगाच्या चाकोरीतून बाहेर पडून आपापल्या परीने धडपड करीत आहेत. ख-या अर्थाने सामाजिक बदलांची धुरा सांभाळणा-या या युवांना आर्थिक सक्षम करण्यासाठी पुरेसे ज्ञान, आर्थिक पाठबळ व योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. युवांची ही गरज ओळखून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने यशवंत युवा फेलोशिप २०१० पासून सुरु करण्यात आली. समाजाला भेडसावणा-या प्रश्नांवर मात करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात रचनात्मक कार्य सुरु केलेल्या युवांना मार्गदर्शन, आर्थिक पाठबळ व प्रोत्साहन देणे हा यशवंत युवा फेलोशिपचा उद्देश आहे.

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft