युरोपियन युनियन चेंबर ऑफ कॉमर्स
युरोपियन युनियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या भारतीय विभागाचे सहकार्य प्रतिष्ठानच्या उपक्रमांना लाभत असून महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग व सहकार या सामाजिक क्षेत्रांच्या भरीव वृध्दीसाठी ते फार महत्वाचे आहे. युरोपियन युनियन चेंबर ऑफ कॉमर्स इन इंडियाद्वारे निरनिराळ्या क्षेत्रात प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक मदत कशी उपलब्ध करुन घेता येईल, याची माहिती प्रसिद्ध केली जाते. या संस्थेस प्रतिष्ठानने केंद्र इमारतीच्या तिस-या मजल्यावर जागा दिली आहे.