मा.खा.सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत
मराठवाड्यातील सहा जिल्ह्यात उमेद कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्रात २०१६-१७ वर्षात शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ झालेली आहे. दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्यांचा आकडा हा वाढतच चालला आहे. शासकीय यंत्रणेमार्फत तसेच इतर स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या होऊ नयेत यासाठी प्रयत्न होतात. परंतु आत्महत्या झालेल्या शेतक-यांच्या कुटूंबीयांचे पुढे भवितव्य काय? हा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा बनत चालला आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांना केवळ आर्थिक मदत देऊन उपयोग नाही तर त्यांचे संपूर्ण पुर्नवसन व्हायला हवे या भूमिकेतून खा.सुप्रिया सुळे यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये 'उमेद' या आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिला सहायता उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. यशस्विनी सामाजिक अभियान व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई च्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

समुपदेशन, प्रशिक्षण व प्रत्यक्ष मदत या त्रिसुत्रीच्या आधारे सुरु असलेल्या या उपक्रमामध्ये मराठवाड्यातील सोळा ते चाळीस वयोगटातील दोनशे विधवा महिलांची निवड करण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पंचवीस आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील विधवा महिला या उपक्रमात असणार आहेत. या महिलांना आर्थिक स्वावलंबन, त्यांच्या पाल्यांचे शिक्षण व त्यांचे आरोग्य या माध्यमातून सहाय्य करण्यात येणार आहे.

मा.खा.सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२२ ते २५ मे २०१७ या काळात लातुर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना व औरंगाबाद या सहा जिल्ह्यांमध्ये उमेद या कार्यक्रमांतर्गत पिठाची गिरणी, दोन शेळ्या, पिको फॉल मशिन, शिलाई मशीन, शेवयाची मशीन यापैकी एक व्यवसाय साधन व हेल्थ कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. औरंगाबाद येथील एम.जी.एम. रुग्णालयात त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च मोफत करण्यात येणार आहे. यासाठीचे हेल्थ कार्ड देखील त्यांना या कार्यक्रमात देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील सहा जिल्ह्यातील ३६ विद्यार्थ्यांची माध्यमिक व उच्च शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्यात आलेली आहे.

सोमवार, दि. २२ मे २०१७ रोजी दुपारी ३ वाजता हॉटेल मयुरा, लातुर येथे खा.सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यवसाय साधने वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. याप्रसंगी लातुर जिल्ह्यातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. जिल्ह्यातील २५ महिलांना या उपक्रमांतर्गत लाभ मिळेल.

मंगळवार, दि. २३ मे २०१७ रोजी दुपारी १२ वाजता नांदेड येथे खा.सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यवसाय साधने वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. याप्रसंगी नांदेड जिल्ह्यातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. जिल्ह्यातील २५ महिलांना या उपक्रमांतर्गत लाभ मिळेल.
मंगळवार, दि. २३ मे २०१७ रोजी दुपारी ३ वाजता वर्धमान मंगल कार्यालय, वसमत जि.हिंगोली येथे खा.सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यवसाय साधने वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. याप्रसंगी माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर, आ.रामराव वडकुते, मुनीर पटेल, दिलीप चव्हाण, जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. जिल्ह्यातील २५ महिलांना या उपक्रमांतर्गत लाभ मिळेल.
बुधवार, दि. २४ मे २०१७ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी भवन, परभणी येथे खा.सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यवसाय साधने वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. याप्रसंगी आ.बाबाजानी दुर्राणी, आ.विजय भांबळे, आ.डॉ.मधुसूदन वेंâद्रे, माजी मंत्री डॉ.फौजिया खान, जि.प.उपाध्यक्ष भावना नखाते यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. जिल्ह्यातील २५ महिलांना या उपक्रमांतर्गत लाभ मिळेल.
बुधवार, दि. २४ मे २०१७ रोजी दुपारी ३ वाजता मत्स्योदरी महाविद्यालय, जालना येथे खा.सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यवसाय साधने वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. याप्रसंगी आ.राजेश टोपे, माजी आ.चंद्रकांत दानवे, जि.प.उपाध्यक्ष सतीश टोपे, डॉ.निसार देशमुख, राजेश राऊत यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. जिल्ह्यातील २५ महिलांना या उपक्रमांतर्गत लाभ मिळेल.
गुरुवार, दि. २५ मे २०१७ रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी भवन, औरंगाबाद येथे खा.सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यवसाय साधने वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. याप्रसंगी आ.भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आ.सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, माजी आ.संजय वाकचौरे, कदीर मौलाना, प्रा.किशोर पाटील, काशीनाथ कोकाटे, सुधाकर सोनवणे, रंगनाथ काळे, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, विलास चव्हाण, वैâलास पाटील पाथ्रीकर, विजयकुमार साळवे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. जिल्ह्यातील २५ महिलांना या उपक्रमांतर्गत लाभ मिळेल.

या सर्व कार्यक्रमांना त्या त्या जिल्ह्यातील नागरीकांनी हजर रहावे असे आवाहन यशस्विनी अभियानाच्या वतीने राज्यस्तरीय समन्वयक उषाताई दराडे, विश्वास ठावूâर, सुरेखाताई ठाकरे, आशाताई भिसे, दत्ता बाळसराफ, विजय कान्हेकर व उपक्रमाचे समन्वयक नीलेश राऊत यांनी केले आहे. बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील व्यवसाय साधने वाटप कार्यक्रमाचे आयोजन जून २०१७ महिन्यात करण्यात येईल असे संयोजन समितीच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft