80900685 1298202000388109 2297961400628150272 oएकदिवशीय चित्रपट रसग्रहण शिबिर...
१० वा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १७ जानेवारी ते २३ जानेवारी २०२० या कालावधीमध्ये होत असून त्यानिमित्ताने शनिवार, ४ जानेवारी २०२० दुपारी २ ते ७ यावेळेत, रंगस्वर सभागृह, चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट, येथे 'एकदिवशीय चित्रपट रसग्रहण शिबिर' होणार असून यासाठी प्रसिद्ध नाट्य/चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व प्रसिद्ध व लोकप्रिय चित्रपट शिक्षण तज्ञ श्री. समर नखाते मार्गदर्शन करणार आहेत. मोफत रजिस्ट्रेशनसाठी अतूल यांच्याशी ०२२-२२०२८५९८वर संपर्क साधावा.

नवव्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शानदार शुभारंभ
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल प्रमुख पाहुणे

010


यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शानदार उदघाटन रविवार दिनांक २० जानेवारी रोजी सायंकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरदराव पवार, सरचिटणीस शरद काळे, यशवंत चित्रपट महोत्सवाचे मार्गदर्शक व समन्वयक डॉ. जब्बार पटेल आणि कार्यकारी समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft