एकदिवसीय चित्रपट रसग्रहण शिबिर उत्साहात संपन्नजानेवारीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची नांदी म्हणून यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पु. ल. अकादमीच्या सहयोगाने २ जानेवारी, २०१८ ला रवींद्र मिनी थियेटरमध्ये एकदिवसीय चित्रपट रसग्रहण शिबिराचे आयोजन आयोजन करण्यात आले होते. ह्या शिबिरात प्रसिद्ध नाट्य/चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व प्रसिद्ध व लोकप्रिय चित्रपट शिक्षण तज्ञ श्री. समर नखाते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अधिक चित्रपट प्रेमींची उपस्थिती होती.

प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे, नितीन वैद्य, चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व प्रसिद्ध व लोकप्रिय चित्रपट शिक्षण तज्ञ श्री. समर नखाते आणि महेंद्र तेरेदेसाई, संजय बनसोडे, दत्ता बाळ सराफ आणि महेश चव्हाण इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

 ‘८वा’ यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवबहुचर्चित यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१८, शुक्रवार १९ जानेवारीला सुरुवात होणार असून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव रंगणार आहे. १९ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी प्रतिनिधी नोंदणी शुल्क प्रत्येकी २०० रूपये असून https://goo.gl/iYUPyb या लिंकवरती जाऊन नोंदणी करावी.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft