बहुचर्चित ‘९ वा’ यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव...

fb banner

मुंबई-ठाणे-नवीमुंबई बहुचर्चित ९ वा यशवंत आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० जानेवारी सुरू होणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये रंगणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. शरद पवार आणि कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी चित्रपट दिग्दर्शक व निर्माते श्याम बेनेगल यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल गौरविण्यात येणार आहे. तसेच या महोत्सवात प्रतिष्ठान महोत्सवाचे संचालक जब्बार पटेल, सरचिटणीस शरद काळे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यांची उपस्थित असणार आहे.


यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१९ महोत्सवाचे ९ वे वर्ष आहे. या महोत्सवा दरम्यान भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान देणा-यास गौरविण्यात येते. आतापर्यंत रमेश सिप्पी, पंकज कपूर, अनूपम खेर, वहिदा रेहमान सारख्या दिग्गज कलाकारांना गौरविण्यात आले आहे.
यंदा या महोत्सवात चित्रपट रसिकांसाठी विविध भाषेतील आणि विविध देशातील काही निवडक ६० चित्रपटांची मेजवानी आहे. २४ जानेवारीला अभिनेत्री नंदीता दास या ६.३० वाजता चित्रपटप्रेमींना मार्गदर्शन करणार आहेत.
२० जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान मुंबईकरांना जगभारतील विविध भाषातील नावाजलेले चित्रपट पाहता येणार आहे. चीन, रशिया, फ्रान्स, इराण, बेल्जियम, अर्जेंटिना, इस्त्रायल, तुर्की, चिली आदी देशांतील चित्रपट एकाच ठिकाणी पाहण्याची सुवर्णसंधी सर्वासाठी यशवंत चित्रपट महोत्सवाने उपलब्ध करुन दिली आहे. अशी माहिती महोत्सवाचे मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यांनी दिली.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft