१० वी, १२ बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सेमीनार

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी विभागातर्फे १० वी आणि १२ बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चव्हाण सेंटरमध्ये मोफत करिअर मार्गदर्शन सेमीनारचे आयोजन करण्यात आले आहे. सेमीनार १० जूनला शनिवारी दुपारी ४ वाजता सुरू होईल. व्यावसायिक मार्गदर्शन आणि निवड संस्थेच्या सल्लागार दिपाली दिवेकर सेमीनारमध्ये मार्गदर्शन करणार आहे. माहिती तंत्रज्ञान प्रबोधिनी विभागाने विद्यार्थ्यांनी अधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे. संपर्क २२८१७९७५, २२०४३६१७, ९७६९२५६३४३

  माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी

२१ व्या शतकास सामोरे जाण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान हे अतिशय वेगवान व प्रभावी तंत्रज्ञान साधन उपलब्ध आहे, हे आता सर्वसामान्य झालेले आहे. संगणकाचा वापर सर्वच क्षेत्रात सुरु झालेला आहे. संगणकाच्या प्राथमिक वापरापासून ते इंटरनेटपर्यंतचे शिक्षण आपल्या गरजेप्रमाणे घेणे हे आधुनिक भारतात आवश्यक झाले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा पूर्ण लाभ मिळविण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञ तयार होणेही आवश्यक आहे. या दूरदृष्टीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. शरदराव पवार यांनी विश्वस्तांसमोर प्रतिष्ठानने 'माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी' स्थापन करून नवीन युवक-युवतींना संगणक प्रशिक्षणाचा लाभ देता यावा म्हणून सीडॅक, पुणे या नामवंत संस्थेचे कोर्सेस प्रतिष्ठानने सुरु करावेत, असा विचार मांडला. इतकेच नव्हेतर, महाराष्ट्रातील सर्व माध्यमिक शाळा संगणकाद्वारे प्रतिष्ठानला जोडून 'एज्युकेशन टू होम' ही योजना सुरु करण्याबद्दलही विचार मांडला. त्यास अनुसरून प्रतिष्ठानने सीडॅक, पुणे या संस्थेबरोबर ४ जानेवारी १९९९ रोजी करार करुन 'माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी'ची स्थापना केली व पहिला डिप्लोमा इन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (डीआयटी) ही कोर्स १० मे १९९९ रोजी सुरु झाला. ह्या माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनीचे काम श्री. सुशील गुप्तन संचालक म्हणून कुशलतेने पाहत आहेत.

प्रबोधिनीमार्फत राबविले जाणारे अभ्यासक्रम :

डिप्लोमा इन अॅडव्हान्स कम्प्युटिंग (Diploma in Advanced Computing)(PG-DAC)

डिप्लोमा इन अॅडव्हान्स कम्प्युटर आर्ट (Diploma in Advanced Computer Arts) (DACA)

डिप्लोमा इन मल्टिमिडिया क्रिऐशन्स (Diploma in Multimedia Creations) (DMC)

डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (Diploma in Information Technology)(DIT)

सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (Certificate Course in Information Technology) (CCIT)

सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग विथ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीस् (Software Programming with Advance Technologies) (SPAT)

सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटराईज्ड अकाऊंटींग इन्ट्रोडक्शन टू टॅली (Certificate Course in Computerized Accounting (CA3) Introduction to Tally)

प्री डि. ए. सी. (Pre DAC)
   

संचालक-माहिती तंत्रज्ञान प्रबोधिनी  

श्री. सुशिल गुप्तन
संचालक,
माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी,
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft