बारावीनंतर अॅनिमेशनमध्ये करिअर करण्याची संधीजंगलबुक, बाहुबली, सिंड्रेला, डोरेमॉन, मोटू-पतलू असे अनेक अॅनिमेटेड चित्रपट आणि प्रोग्राम आपण सगळेच पाहत असतो. त्यामध्ये लहानगेच नाही तर थोरामोठ्यांना पण पाहण्यामध्ये उत्सुकता असते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, माहिती प्रबोधिनी मध्ये यांचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. सी-डॅक तर्फे चालविण्यात येणारा डिप्लोमा इन अॅडव्हान्स कम्प्युटर आर्टस् (DACA) या कोर्सचा कालावधी सहा महिने पूर्ण वेळ आहे. या कोर्सची पात्रता कोणताही शाखेतून बारावी असणे तसेच टिचर कोर्स, आर्ट टिचर कोर्स, M.F.A, B.F.A, B.Arch., G.D. Arts, त्याचबरोबर कोणत्याही डिग्री किंवा Diploma in Advertisement, Commercial Arts etc. अशी आहे.

या कोर्स मध्ये Image Editing & effects, Print Media, Animation 2D & 3D, 3D Architecture, Cartoon Animation, Digital Audio & Video, 3D Modeling, Web Designing & Web Development या विषयांचा अभ्यासक्रमात सहभाग आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट संभाषण कलेसाठी Business Communication चे वर्ग घेतले जातात.

कंपन्यांनमध्ये विद्यार्थ्यांनी केलेले काम पाठवून व त्यांच्या मुलाखती करवून विद्यार्थ्यांना नोकरी संपादन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान माहिती आणि तंत्रज्ञान प्रबोधिनी कडून मदत केली जाते. या कोर्ससाठी पूर्व परीक्षा पास होणे आवश्यक आहे.

डिप्लोमा इन अॅडव्हान्स कम्पप्युटर आर्ट् (DACA) या कोर्सच्या प्लेसमेंटसाठी Bombay Studio, Intel Gain Technologies Pvt. Ltd., Praxis interactive Services, Western Outdoor Interactive, Neosoft Technologies, Hindustan Pencils, Wisdmlabs, Multiversity etc. या कंपन्यांनी स्वारस्य दर्शवले. संपर्क २२८१७९७५, २२०४३६१७, ९७६९२५६३४३

१० वी, १२ बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मंत्रयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी विभागातर्फे १० वी आणि १२ बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चव्हाण सेंटरमध्ये नुकतेच मोफत करिअर मार्गदर्शन सेमीनारचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये व्यावसायिक मार्गदर्शन आणि निवड संस्थेच्या सल्लागार सुरेश सुरवडे सेमीनारमध्ये मार्गदर्शक म्हणून लाभले.

सुरुवातीला पालक आणि विद्यार्थी यांच्या मधला करिअर निवडण्या मधील गोंधळ विद्यार्थ्याना समजून सांगितला गेला. त्यानंतर विद्यार्थ्यांना अधिक मार्क मिळाले तर सायन्स साइटला जाण्यासाठी दबाव आणला जातो, अशा प्रकारची विविध उदाहरण सांगून विद्यार्थ्याना सुरवडे यांनी मार्गदर्शन केले.
कला, कॉमर्स, सायन्स हे निवड असतात काय प्रॉब्लेम असतात, आपला कल असेल तेच क्षेत्र निवडावे, आपल्याला ज्या क्षेत्राची आवड आहे अशाच क्षेत्रात जावे अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

   

संचालक-माहिती तंत्रज्ञान प्रबोधिनी  

श्री. सुशिल गुप्तन
संचालक,
माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी,
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft