मुख्य सभागृहयशवंतराव चव्हाण केंद्रामधील सुसज्ज मुख्य सभागृह हे मुंबईमधील प्रमुख सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी असणारे ठिकाण आहे. शहरामध्ये उच्च दर्जाच्या सोयी आणि उत्तम व्यवस्था पुरवणा-या सभागृहांमध्ये हे सभागृह आघाडीवर आहे. एकूण ६५० आसन क्षमता असणा-या मुख्य सभागृहाचा वापर विविध कार्यक्रमांसाठी तसेच निरनिराळ्या सामाजिक संस्था, शासनातर्फे आयोजित केलेल्या सभा, संमेलने, चर्चा, परिसंवाद, चित्रपट, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, बैठका यांसाठी करण्यात येतो. मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजी नाटके, संगीतसभा आदी कार्यक्रमांसाठी सभागृह भाडेतत्वावर देण्यात येते. वातानुकूलन यंत्रणा, आरामदायी खुर्च्या, अप्रतिम डॉल्बी डिजिटल साउंड सिस्टिम इत्यादी सुविधांनी मुख्य सभागृह सुसज्ज आहे.मुख्य सभागृहामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे यशवंतरावांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय पुरस्कार वितरण तसेच पुण्यतिथीदिनी राज्य पुरस्कारांचे वितरण, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.

   

यशवंतराव चव्हाण केंद्र सभागृहे  

   

सभागृहाविषयी संपर्क  

श्री. विजय देसाई
सरव्यवस्थापक, सभागृहे

यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- ०२२-२२०४७२५२ / ०२२-२२०४७२४८

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft