मा. यशवंतराव चव्हाण यांची ३३ वी पुण्यतिथी...आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व धुरंधर राष्ट्रीय नेते मा. यशवंतराव चव्हाण यांच्या ३३ वी पुण्यतिथी निमित्त शनिवारी दिनांक २५ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रमांचे आयोजन चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईन्ट मुंबई येथे करण्यात आले आहे.
असे कार्यक्रम होतील
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई पुरस्कृत न्यायमूर्ती वाय्. व्ही. चंद्रचूड पारितोषिक वितरण,
मा. यशवंतराव चव्हाण यांच्या "भूमिका" व "माझ्या विद्यार्थी मित्रांनो"ऑडिओ सीडीचे प्रकाशन,
वि. का. राजवाडे यांच्या साहित्याच्या वेबसाईटचे उद्घाटन, "लोकमान्य ते महात्मा" या पुस्तकाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन,
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक २०१७ प्रदान करणे, राज्यस्तरीय पारितोषिक स्वीकाराचे भाषण,
यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०१७ जाहीर करणे,
अध्यक्षांचे भाषण.

सोन्याचा व्यवसायातला सोन्यासारखा माणूस

रुपयाचे आता मोल राहिलेले नसले तरी ज्याला रुपयाची किंमत कळाली तोच खरा श्रीमंत..

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३२ व्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात शुक्रवारी २५ नोव्हेंबर २०१६ रोजी पार पडला. त्यावेळी खासदार व प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी स्वागत व प्रास्ताविक म्हणून प्रतिष्ठानच्या उपक्रमाविषयी सांगताना त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे आता १२ विभागीय केंद्र सुरु झाले आहेत. प्रतिष्ठानतर्फे शेतीकट्टा तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिला पुनर्वसन उपक्रम 'उमेद'च्या माध्यमातून त्यांची मदत करणे त्यांना जगण्याची उमेद देणे अशा २०० महिलांना प्रतिष्ठाने दत्तक घेतले आहे. तसेच मा. शरदचंद्रजी पवार यांच्या कायदेमंडळातील पाच दशके २२ फेब्रुवारी २०१७ ला पूर्ण होत असून त्यानिमित्त राज्यस्तरीय शालेय निबंध स्पर्धा व महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घ्यावी असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. तसेच न्यायमूर्ती वाय्. व्ही. चंद्रचूड पारितोषिक प्राप्त नेहा भंडारी यांचेही कौतुक त्यांनी केले.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft