यंदाचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार विदर्भ संशोधन मंडळाला जाहीरयशवंतराव चव्हाण यांच्या विविध क्षेत्रांतील लक्षणीय कामगिरीमुळे एक सुसंस्कृत नेते व द्रष्टे लोकाग्रणी म्हणून त्यांचे स्थान लोकमानसात आजही अढळ आहे. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा जतन करून सार्वजनिक हिताचे विविध उपक्रम हाती घेण्याच्या उद्देशाने १९८५ साली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईची स्थापना करण्यात झाली.

प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी मा. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. हे पारितोषिक कृषी औद्योगिक समाज रचना किंवा व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता/विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास/अर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य संस्कृती/ कला-क्रिडा या क्षेत्रातील भरीव व पथदर्शी कार्य करणा-या व्यक्तीस अगर संस्थेस देण्यात येते.

महाराष्ट्रात साहित्य, संस्कृती आणि इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात विदर्भ संशोधन मंडळ ही एक नामवंत संस्था आहे. विदर्भातील नव्या पिढीच्या संशोधकांना स्वतंत्र व्यासपीठ प्राप्त व्हावे, त्यांच्यात संशोधनाविषयी आवड निर्माण व्हावी व त्यांच्या संशोधनाला चालना प्राप्त होऊन नव-नवीन संशोधन विव्दज्जनांच्या पुढे या उद्देशाने विदर्भ संशोधन मंडळाची स्थापणा होऊन विस्तार झाला. सदर संस्थेचे दीर्घकालीन वाङमयीन व ऐतिहासिक कार्य लक्षात घेता या कार्याची गौरवपूर्ण नोंद घ्यावी म्हणून या वर्षीचे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरावरील पारितोषिक मा. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त २५ नोव्हेंबर २०१८ या दिवशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. शरद पवार यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात सायंकाळी ५ वाजता सुरू होईल.

लवकरच वयाची १०० वर्ष पूर्ण करणारे भुजंगराव कुलकर्णी यांना
यशंवतराव चव्हाण राज्यस्तरीय २०१७ पुरस्कार प्रदान...

2511 award

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात शुक्रवारी २५ नोव्हेंबर २०१७ रोजी पार पडला. त्यावेळी खासदार व प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी स्वागत व प्रास्ताविक म्हणून प्रतिष्ठानवतीने शिक्षण, आरोग्य, अपंग व इतर उपक्रमाविषयी थोडक्यात आढावा घेतला यामध्ये विधवा महिला पुनर्वसन उपक्रम 'उमेद'च्या माध्यमातून त्यांची मदत करणे त्यांना जगण्याची उमेद देणे. शिक्षण व शिक्षणक्षेत्रात होणारे बदल प्रतिष्ठानच्या माध्यामतून राबविणे अशा अनेक उपक्रमाविषयी माहिती दिली. तसेच पुढील वर्षी ‘युवा संवाद यात्रा’च्या माध्यामातून यशवंतराव चव्हाण यांची ओळख युवा पिढीला होण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कॉलेजेसमधून चर्चासत्राचे आयोजन केले जाईल असे यावेळी सांगितले.या कार्यक्रमध्ये वि.का. राजवाडे यांच्या संकेतस्थळाचे अनावरण व सदानंद मोरे लिखीत..“लोकमान्य ते महात्मा”या पुस्तकांचे प्रकाशन प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमात १२ मार्च २०१८ रोजी ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रोफेसर एम. एम शर्मा यांना दिला जाईल अशी घोषणा पुरस्कार समितीचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी केली.

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०१७
यशवंतराव चव्हाण यांच्या ३३ व्या पुण्यतिथी निमित्त दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्सस्तरीय पुरस्कार २०१७' थोर प्रशासकीय सेवक भुजंगराव कुलकर्णी यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शरद पवार यांनी सांगितले की भुजंगराव कुलकर्णी हे दोन महिने अकरा दिवसांनी वयाची १०० वर्षपूर्ण करत आहेत असे सांगितले. या कार्यक्रमासाठी नेहरु सेंटरचे सतिश सहानी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरिश मिश्रा यांनी केले

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft