यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक जाहिर...

11 3 2020 9 28 21 AM


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक 'लोकहितवादी मंडळ' या संस्थेस जाहीर झाला आहे. कृषी, औद्योगिक, समाजरचना-व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान, तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्ती अथवा संस्थेस या पुरस्कारांने गौरवण्यात येते. 2 लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. शरद पावार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात येईल. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजे बुधवार २५ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण केंद्रात त्याचे वितरण होईल.

प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रदान...

11 25 2019 4 48 23 PM

कराड, दि. २५ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत मा. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना ज्येष्ठ नेते, माजी कृषी मंत्री, भारत सरकार मा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे मा. अरुण गुजराथी, मा. शरद काळे, मा. अजित निंबाळकर, डॉ. अनिल काकोडकर, मा. राम खांडेकर, डॉ. सदानंद गोडसे, मा. दिलीप माजगावकर, मा. आ. बाळासाहेब पाटील, मा. सौ. सरोज (माई) पाटील, मा. मीनाताई जगधने, मा. खा. श्रीनिवास पाटील, मा. कल्लाप्पाआण्णा आवाडे, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. डॉ. अनिल पाटील, अॅड. रवींद्र पवार, मा. आबासाहेब देशमुख, मा. अरुण लाड, सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, सहसचिव डॉ. विजयसिंह सावंत, प्राचार्य डॉ. माहन राजमाने, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे पदाधिकारी, मा. प्रभाकर देशमुख उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले की, यशवंतराव चव्हाणांच्या जीवनातील अनेक घडामोडी मी जवळून पाहिल्या आहेत. त्यांच्या राजकारणाची जडण-घडण मी अनुभवली आहे. ते उदारमतवादी होते. अशा महान व्यक्तीच्या नावाने दिला जाणार पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे. मिळालेल्या पुरस्कारातील एक लाख रुपये माझी मातृसंस्था रयत शिक्षण संस्थेला देत आहे. तसेच इचलकरंजी येथील वाचनालयाच्या इमारतीसाठी एक लाख रुपये देत आहे, असे त्यांनी जाहीर केले.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft