मा. यशवंतराव चव्हाण यांची ३२ वी पुण्यतिथी...

32 Ybchavan

शुक्रवार दिनांक २५ नोव्हेंबर २०१६, सायंकाळी ५.३० वा. होणार असून ह्यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई पुरस्कृत न्यायमूर्ती वाय्. व्ही. चंद्रचूड पारितोषिक वितरण, मा. यशवंतराव चव्हाण यांच्या "सह्याद्रीचे वारे" ऑडिओ सीडीचे प्रकाशन, यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक २०१६ प्रदान., राज्यस्तरीय पारितोषिक स्वीकाराचे भाषण, यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०१६ जाहीर करणे., अध्यक्षांचे भाषण असे कार्यक्रम पार पडणार आहेत. कृपया कार्यक्रमास उपस्थित रहावे ही विनंती.

  मा. यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी

२५ नोव्हेंबर ही मा. यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी या दिवशी यशवंतराव चव्हाण केंद्र येथे मुख्य कार्यक्रम पार पडतो तसेच प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्रांमध्ये विशेशतः देवराष्ट्रे येथे मा. यशवंतरावांच्या जन्मघरी व विभागीय केंद्र कराड च्या वतीने कराड मधील विरंगुळा येथे पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पडतो. यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबई येथील मुख्य कार्यक्रमास प्रतिष्ठानचे पदाधिकारी, राज्यभरातील कार्यकर्ते तसेच अनेक नागरीक आवर्जून उपस्थित असतात. या कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिकाचे वितरण केले जाते.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft