यंदाचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार
प्रा. एन. डी. पाटील यांना जाहीर

invitation front 

invitation back

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कृषी औद्यागिक समाजरचना, व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य, संस्कृती, कला-क्रिडा या क्षेत्रांमध्ये लक्षणीय कामगिरी करणा-या महाराष्ट्रातील व्यक्तीस/ संस्थेस यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. वरील क्षेत्रामध्ये लक्षणीय कार्य करणा-या व्यक्ती अगर संस्था यांच्या विषयी प्राप्त झालेल्या शिफारसींचा विचार करून पारितोषिक निवड समितीने प्रा. एन. डी. पाटील यांची या वर्षीच्या पारितोषिकासाठी निवड केलेली आहे. रोख रक्कम रु. २,००,००० व मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरुप आहे. 
प्रा. एन. डी. पाटील अनेक वर्ष रयत शिक्षण संस्थेसारख्या अग्रगण्य शिक्षण संस्थेत अध्यक्ष/ कार्यवाह म्हणून कार्य करीत आहेत. त्या संस्थेत त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आश्रमशाळा, श्रमिक विद्यापीठ, संगणक शिक्षण केंद्र, स्पर्धा परीक्षा केंद्र वगैरे सुरू करून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या संस्थेस आधुनिक रूप दिले आहे. अठरा वर्ष ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत व दोन वर्ष सहकार मंत्री म्हणून काम केले आहे. त्यांच्या कार्याचा विस्तार व आवाका फार मोठा आहे. त्यांचे असाधारण कर्तुत्व लक्षात घेऊन हे पारितोषिक मा. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता सदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड, कराड मसुर रोड, विद्यानगर, सैदापूर, ता. कराड, जि. सातारा, महाराष्ट्र ४१५१२४ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री शरद पवार यांच्या हस्ते प्रा. एन. डी. पाटील यांना देण्यात येईल.
तसेच कार्यक्रमात ‘राजहंस प्रकाशन’ निर्मित व श्री राम खांडेकर लिखित ‘सत्तेच्या पडछायेत’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft