यंदाचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार विदर्भ संशोधन मंडळाला जाहीरयशवंतराव चव्हाण यांच्या विविध क्षेत्रांतील लक्षणीय कामगिरीमुळे एक सुसंस्कृत नेते व द्रष्टे लोकाग्रणी म्हणून त्यांचे स्थान लोकमानसात आजही अढळ आहे. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा जतन करून सार्वजनिक हिताचे विविध उपक्रम हाती घेण्याच्या उद्देशाने १९८५ साली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईची स्थापना करण्यात झाली.

प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी मा. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. हे पारितोषिक कृषी औद्योगिक समाज रचना किंवा व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता/विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास/अर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य संस्कृती/ कला-क्रिडा या क्षेत्रातील भरीव व पथदर्शी कार्य करणा-या व्यक्तीस अगर संस्थेस देण्यात येते.

महाराष्ट्रात साहित्य, संस्कृती आणि इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात विदर्भ संशोधन मंडळ ही एक नामवंत संस्था आहे. विदर्भातील नव्या पिढीच्या संशोधकांना स्वतंत्र व्यासपीठ प्राप्त व्हावे, त्यांच्यात संशोधनाविषयी आवड निर्माण व्हावी व त्यांच्या संशोधनाला चालना प्राप्त होऊन नव-नवीन संशोधन विव्दज्जनांच्या पुढे या उद्देशाने विदर्भ संशोधन मंडळाची स्थापणा होऊन विस्तार झाला. सदर संस्थेचे दीर्घकालीन वाङमयीन व ऐतिहासिक कार्य लक्षात घेता या कार्याची गौरवपूर्ण नोंद घ्यावी म्हणून या वर्षीचे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरावरील पारितोषिक मा. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त २५ नोव्हेंबर २०१८ या दिवशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. शरद पवार यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात सायंकाळी ५ वाजता सुरू होईल.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft