यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२०
लोकहितवादी मंडळास प्रदान...

WhatsApp Image 2020 11 25 at 9.08.39 PM 8नाशिक शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या लोकहितवादी मंडळास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दोन लाखांचा मानाचा पुरस्कार प्रदान प्रतिषठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मुबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्राच्या सभागृहामध्ये झालेल्या या सोहळ्यात लोकहितवादी मंडळाच्या वतीने अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनीमित्त विविध क्षेत्रांतील लक्षणीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. हे पारितोषिक कृषी, औद्योगिक, समाजरचना किंवा व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास आर्थिक-सामाजिक विकास, मराठी साहित्य संस्कृती कला, क्रिडा या क्षेत्रातीवल भरीव व पथदर्शी कार्य करणा-या व्यक्तीस अगर संस्थेस देण्यात येते. महाराष्ट्रात साहित्य, संस्कृती व कला क्षेत्रातील रचनात्मक, प्रेरक आणि भरवी योगदानासाठी लोकहितवादी मंडळ ही एक नामवंत संस्था आहे. कवी, कुलगुरु कुसुमाग्रज यांनी सन १९५० मध्ये लोकहितवादी मंडळाची स्थापना केली. मंडळाने मराठी साहित्य, भाषा, सर्व कला क्षेत्रात नाशिकचा चेहरामोहरा बदलण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. त्याची दखल घेत नाशिकच्या या संस्थेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे, उपाध्यक्ष ज्येष्ठ नेत अरुणभाई गुजराथी. कोषाध्यक्ष हेमंत टकले, सरचिटणीस शरद काळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सुत्रसंचालन अमरिश मिश्रा यांनी केले.

प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीन सुरु असलेल्या कार्याचा आढावा घेतला तसेच कोराना काळामध्ये ऑनलाईन पद्धतीने शिक्षण विकास मंच असे अनेक विभागाचे कार्यक्रम सुरु ठेवले आहेत.
या कार्यक्रमामध्ये १२ मार्च २०२१ रोजी 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार ' एमकेसीएल विवेक सावंत यांना दिला जाणार आहे अशी घोषणा पुरस्कार समितीचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी केला

३६वी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक'लोकहितवादी मंडळ'या संस्थेस...

25112020 1

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक'लोकहितवादी मंडळ'या संस्थेस जाहीर झाला आहे. कृषी, औद्योगिक, समाजरचना-व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान, तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्ती अथवा संस्थेस या पुरस्कारांने गौरवण्यात येते. 2 लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. शरद पावार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात येईल. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजे बुधवार २५ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण केंद्रात त्याचे वितरण होईल. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या फेसबुक पेज (https://www.facebook.com/ycp100) पाहता येणार आहे.
   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft