स्टारकी फाऊंडेशनचे संस्थापक बिल ऑस्टीन यांना
‘यशवंतराव चव्हाण विशेष पुरस्कार’ प्रदान...

IMG 20190312 WA0034


यशवंतराव चव्हाण यांच्या १०६ व्या जयंती रोजी ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार - २०१८’ च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी केले. यशवंतराव चव्हाण कोण होते, त्यांनी केलेल्या कार्याची येणा-या पिढीला माहिती व्हावी, यासाठी यशवंतराव चव्हाण यांची माहिती पुस्तिका काढण्यात येणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. पुरस्काराच्या सन्मानपत्राचे वाचन कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी केले. यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान चे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते स्टारकी फाउंडेशनचे संस्थापक बिल ऑस्टीन यांना ‘यशवंतराव चव्हाण विशेष पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, टाटा ट्रस्ट, ठाकरसी ग्रुप, आर. व्ही. एस. ट्रस्ट, पवार पब्लिक ट्रस्ट, महात्मा गांधी सेवा संघ जिल्हा पुनर्वसन केंद्र, पुणे यांना गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्टारकी फाउंडेशनचे संस्थापक बिल ऑस्टीन यांनी मनोगत व्यक्त केले. समितीचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी राष्ट्रीय पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती दिली. या राष्ट्रीय पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांनी केले. हा पुरस्कार रिझर्व बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबरीष मिश्र यांनी केले. व्यवसाय करत असताना सामाजिक प्रश्नांचं भान बाळगण्याच काम बिल ऑस्टीन यांनी केलं आहे, असे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले की, जगभरात विविध गटांतील कर्णबधीर लोकांना मोफत कर्णयंत्र देण्याचा जागतिक उपक्रम ते राबवत आहेत. शरद पवार यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

डॉ. रघुराम राजन यांचे मनोगत  स्टारकी फाऊंडेशन व्हिडिओ
     राष्ट्रीय पुरस्कार मानपत्र बिल अँस्टीन मानपत्र
           वार्तापत्र २०१९

‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार - २०१८’
डॉ. रघुराम राजन यांना...

BANNER 12032019

राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची १०६ वी जयंती १२ मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये साजरी करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे समारंभाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. या कार्यक्रमात ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार - २०१८’ हा पुरस्कार रिझर्व बँक ऑफ इंडियाचे माजी गवर्नर डॉ. रघुराम राजन यांना प्रदान करण्यात येणार आहे.
६ तासांत ४८४० कर्णबधिरांना कर्णयंत्र लावून "गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" करण्यात आला आहे. या गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, टाटा ट्रस्ट, ठाकरसी ग्रुप, आर. व्ही. एस. ट्रस्ट, पवार पब्लिक ट्रस्ट, महात्मा गांधी सेवा संघ जिल्हा पुनर्वसन केंद्र, पुणे यांना गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी यांच्या हस्ते देण्यात येणार असून स्टार्की फाऊंडेशन अमेरिकेचे संस्थापक बिल अॅस्टीन व त्यांच्या पत्नी टॅनी अॅस्टिन यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने 'यशवंतराव चव्हाण विशेष पुरस्कार, भारत' देवून गौरविण्यात येणार आहे.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft