"यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार"
पद्मविभूषण डॉ. मनमनोहन शर्मा यांना प्रदान...


महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या १०५ जयंतीच्या कार्यक्रमात पदमविभूषण डॉ. मनमोहन शर्मा यांना २०१८ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप रुपये ५ लाख रुपये, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे होते. विशेष म्हणजे शर्मा यांनी मुंबईतील शालेय मुलांना आज व्याख्यान देऊन विध्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी यांनी केले. प्रास्ताविक प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी केले यावेळी त्यांनी प्रतिष्ठितर्फे सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर "यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार" समितीचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी राष्ट्रीय पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती दिली. या राष्ट्रीय पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांनी केले.

शर्मा यांनी सुरुवातीला त्याचं शिक्षण कशाप्रकारे झाले हे उपस्थिनांना सांगितले. त्यानंतर त्यांनी कशा प्रकारे रसायनशास्त्र विषयात प्रगती केली हे थोडक्यात सांगितले. हा पुरस्कार मला दिल्याबद्दल मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा ऋणी आहे असेही ते म्हणाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजस्थान मधील एका खेड्यातील शर्मा यांनी रसायन शास्त्रात प्रगती करून मिळवलेल्या पुरस्कारांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी केले.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft