‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार – २०१९ जाहीर’...

WhatsApp Image 2020 03 03 at 11.55.58 AM

राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची जयंती दरवर्षी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये साजरी करण्यात येते. त्यांच्या जयंतीनिमित्त ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो.
यावेळी त्यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त म्हणजेच १२ मार्च २०२० रोजी ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार – २०१९’चे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीचा ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०१९’ नोबेल पारितोषिक विजेते डॉ. अभिजीत बॅनर्जी यांना जाहीर करण्यात आला आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार हे समारंभाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. या सोहळ्याचे औचित्य साधून ‘यशवंतराव चव्हाण यांचे प्रकट चिंतन – भारत: समाज आणि राजकारण’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. हा सोहळा गुरुवार दिनांक १२ मार्च २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता, यशवंतराव चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे पार पडेल. तरी आपण सर्वांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft