अनेक शहरे उद्योगाच्या क्षेत्रात उच्चांक गाठण्याच्या मागे
यशवंतराव चव्हाण यांची दूरदृष्टी महत्त्वाची होती – शरद पवार
https://ycpmumbai.com/index.php/%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80#sigFreeId6f99ee9d56
राज्य आल्यावर त्याचा वापर कसा करायचा ही भूमिका मांडण्याचे काम यशवंतराव चव्हाण साहेबांनी अनेक व्याख्यानातून केले. पंचायत राज्याची यंत्रणा आणली. इतकेच नाही तर सामाजिक,शेती,शिक्षण,औद्योगिक अशा अनेक क्षेत्रात मोलाची कामगिरी त्यांनी केली. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशी अनेक शहरे उद्योगाच्या क्षेत्रात उच्चांक गाठण्याच्या मागे यशवंतराव चव्हाण साहेबांची दूरदृष्टी महत्त्वाची होती असे उद्गार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले. यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या निर्मितीत योगदान महत्त्वाचे आहेच शिवाय हे राज्य मराठी भाषिकांचे होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. पण यात महाराष्ट्राचा मंगलकलश आणण्याचे काम यशवंतराव चव्हाण साहेबांनी केले असेही ते म्हणाले. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार बोलत होते.
यशवंतराव चव्हाण यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त आपण एकत्र आलो आहोत. दरवर्षी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान या दिवशी आपण करतो. मला आनंद आहे की, यावेळेला ज्यांना नोबल पुरस्कार प्राप्त झाला त्यातून भारताचे नावलौकिक वाढवण्याची कामगिरी केली अशा डॉ. अभिजित बॅनर्जी यांचा आपण सन्मान करतो आहोत असेही श्री. पवार यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण साहेब हे देशातील विविध विषयात योगदान दिलेले कर्तृत्ववान व्यक्तिमत्व होते. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले, शैक्षणिक पार्श्वभूमी नाही, सांपत्तिक पार्श्वभूमी अजिबात नाही. पण मातेचे संस्कार ज्यांच्यावर झाले त्याचे ऋण सदैव मानणारे, मातृ पितृ बद्दलाची प्रचंड आस्था असणारे असे यशवंतराव चव्हाण साहेबांचे व्यक्तिमत्व होते, अशा शब्दात शरद पवार यांनी त्यांच्या विविध पैलूंवर भाष्य केले.
‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार – २०१९ जाहीर’...
राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची जयंती दरवर्षी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये साजरी करण्यात येते. त्यांच्या जयंतीनिमित्त ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो.
यावेळी त्यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त म्हणजेच १२ मार्च २०२० रोजी ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार – २०१९’चे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीचा ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०१९’ नोबेल पारितोषिक विजेते डॉ. अभिजीत बॅनर्जी यांना जाहीर करण्यात आला आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार हे समारंभाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. या सोहळ्याचे औचित्य साधून ‘यशवंतराव चव्हाण यांचे प्रकट चिंतन – भारत: समाज आणि राजकारण’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. हा सोहळा गुरुवार दिनांक १२ मार्च २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता, यशवंतराव चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे पार पडेल. तरी आपण सर्वांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.