यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय महाविद्यालयीन
नियतकालिक स्पर्धा २०१९-२० साठी अंक पाठविण्याचे आवाहन
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम

WhatsApp Image 2020 02 17 at 10.43.56 AM

मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा २०१९-२०' चे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या विचारांचे आणि भावनांचे प्रतिबिंब असंख्य महाविद्यालयीन नियतकालिकांमध्ये पडलेले पहावयास मिळते या नियतकालिकांमध्ये आपले लेख, कविता लिहणाऱ्या विद्यार्थ्यांमधूनच उद्याचे साहित्यिक घडत असतात. युवांना आपले मत मांडायची संधी देतानाचा त्यांच्यातील कलागुणांना वाव देणाऱ्या नियतकालिकांचे महत्व लक्षात घेऊन राज्यातील उत्कृष्ट नियतकालिकांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे.
स्पर्धेत राज्यातील उत्कृष्ट महाविद्यालयीन नियतकालीकांस यशवंतराव चव्हाण पारितोषिकाने सन्मानित केले जाते. प्रथम पारितोषिक रु. १०,०००/- चा धनादेश, द्वितीय पारितोषिक रु. ७,०००/- चा धनादेश, तृतीय पारितोषिक रु. ५,०००/- चा धनादेश, उत्तेजनार्थ (पंधरा पारितोषिके - प्रत्येक विद्यापीठातून एक) रु. ३,०००/- प्रत्येकी, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे स्पर्धेचे स्वरुप आहे. सादर केलेल्या नियतकालीकांचे यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालयामध्ये जतन करुन ते विद्यार्थी व अभ्यासकांसाठी उपलब्ध केले जाते.
स्पर्धेकरिता महाविद्यालयांनी आपली नियतकालीकांच्या दोन प्रती सोमवार, दि. २४ फेब्रुवारी २०२० च्या आत प्रति, संघटक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई - २१ या पत्त्यावर पाठवावेत. सदर नियतकालिक हे सन २०१८-१९ चे असावे. लिफाफ्यावर 'यशवतंराव चव्हाण महाविद्यालयीन नियतकालीक स्पर्धा' असा उल्लेख करण्यात यावा. अधिक माहितीकरीता कार्यालयामध्ये (मनीषा) ०२२-२२०२८५९८ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा सुबोध ९८२३०६७८७९, रमेश - ९००४६५२२६२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे संयोजक दत्ता बाळसराफ, सहसंयोजक विश्वास ठाकूर, विजय कान्हेकर व संघटक नीलेश राऊत यांनी केले आहे.

साहित्य हे माणुस म्हणून जगण्याची प्रेरणा देते - प्रसिद्ध कवी ज्ञानेश वाकुडकर

WhatsApp Image 2019 07 31 at 6.02.11 PM

विद्यार्थ्यांनी आपल्या लिखानात सहजता आणावी, त्यामुळे ते लोकांचे लिखाण होईल, सर्वसामान्यांना त्यांचे वाटेल. त्यासाठी लिखाणाचे तंत्र देखील समजून घ्यायला हवे, याकरीता पुस्तके आपली मित्र बनवा. साहित्य हे तुम्हाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देते. जे विद्यार्थी आता विविध प्रकारे अभिव्यक्त होत असतील, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! व पुढील काळात यांच्यातूनच साहित्याच्या नव्या प्रवाहांची निर्मिती व्हावी, असे मत प्रसिद्ध कवी ज्ञानेश वाकुडकर यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयीन नियतकालीक स्पर्धेच्या पारितोषीक वितरण समारंभात ते बोलत होते. नागपूर येथील कमला नेहरू कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स या महाविद्यालयास नियतकालीक स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे राज्यस्तरीय पारितोषीक मिळाले असून त्यानिमित्ताने विशेष समारंभ महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा मा. सुहासिनी वंजारी यांची उपस्थिती होती. तर प्रतिष्ठानचे कार्यक्रम व्यवस्थापक मा. दत्ता बाळसराफ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कांबळे, उपप्राचार्य डॉ.प्रदिप दहीकर, अंकाचे संपादक सिद्धेश देव, सुहास तेंडुलकर, निशिकांत काशीकर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे संघटक नीलेश राऊत व अभिजीत राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यार्थी व प्राध्यापकांची मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांनी अभिव्यक्त होण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करावा

- रविंद्र भैय्या पाटील

 WhatsApp Image 2019 08 01 at 1.44.49 PM

आज तंत्रज्ञानाने समाजातील विविध माध्यमे विद्यार्थ्यांना आपले मतप्रदर्शन करण्याकरीता व आपल्या साहित्यकृती लोकांपर्यंत पोहोचविण्याकरीता उपलब्ध झाली आहेत. त्याचा योग्य वापर करून अभिव्यक्त व्हावे व चांगल्या दर्जाची कलाकृती घडवावी, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई विभागीय केंद्र जळगावचे अध्यक्ष मा. रविंद्र भैय्या पाटील यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयीन नियतकालीक स्पर्धेच्या पारितोषीक वितरण समारंभात ते बोलत होते. भुसावळ येथील भुसावळ कला,विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय या महाविद्यालयास नियतकालीक स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांकाचे राज्यस्तरीय पारितोषीक मिळाले असून त्यानिमित्ताने विशेष समारंभ महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मिनाक्षी वायकोळे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संदीप पाटील यांनी परीश्रम घेतले.

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft