महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे
सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापक प्रशिक्षणाला सुरूवात....

सध्या मुंबई शहरामध्ये २० ते ४० हजार सहकारी गृहनिर्माण संस्था कार्यरत आहेत. या सर्व संस्थांचे काम सुलभ व सुटसुटीत होण्यासाठी शासनाचे कायदे किंवा उपविधी लोकांना माहिती असणे आवश्यक आहेत. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र महिला व्यापीठातर्फे "सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापक प्रशिक्षण" वर्ग यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बेसमेंट हॉलमध्ये आजपासून सुरु करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण ३० जानेवारी ते ३ मार्च २०१७ पर्यंत (सोमवार ते शुक्रवार) दुपारी २ ते ५ या वेळेमध्ये असून हे प्रशिक्षण मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये असणार आहे. पहिल्याच दिवशी व्याख्याते प्रभाकर चुरी यांनी संस्था, इमारत, समस्या या विषयावर प्रक्षिणार्थीना मार्गदर्शन केले.

मुंबईतील विविध विभागातून आज प्रक्षिणार्थी आले होते. त्यापैकी पूर्णवेळ व अर्धवेळ नोकरीसाठी अनेक इच्छुक उमेदवार होते. सुरुवातीला उपस्थितांनी केलेल्या प्रश्नाला चुरी यांनी योग्य उत्तरे दिल्याने प्रक्षिणार्थीचे समाधानकारक चेहरे दिसत होते. इमारतीमध्ये वास्तव करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ह्या समस्येला सामोरे जावे लागते. तीच नाडी पकडून आज व्याख्याते चुरी यांनी मार्गदर्शन करायला सुरुवात केली. त्यांनी संस्था, समस्या, इमारत, नियम, समज-गैरसमज आणि येणाऱ्या विविध अडचणी हे विषय उघड करून सखोल माहिती दिली. उद्या येणा-या प्रक्षिणार्थीला सुद्धा संधी मिळू शकते असे आज सांगण्यात आले. यासाठी प्रशिक्षण शुल्क ४५००/- भरून सहभागी होता येईल. तसेच प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणा-यास प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सध्या घरांच्या किमती खूप वाढल्या आहेत, तर घर घेताना घ्यावयाची काळजी आणि घेतल्यानंतरची प्रक्रिया याविषयी खास मार्गदर्शन केले जाणार आहे.

   महाराष्ट्र महिला व्यासपीठ

महाराष्ट्र महिला व्यासपीठाच्या वतीने महिलांची शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक विविध दृष्टीने सक्षमता वाढावी यासाठी विविध उपक्रम, विविध कार्यशाळा आणि इतर कार्यक्रम यांच्या माध्यमातून कृतीशील प्रयत्न केले जातात. संयोजिका श्रीमती रेखा नार्वेकर, कार्यकारी संयोजिका श्रीमती ममता रमेशचंद्र कानडे महिला व्यासपीठाचे काम पाहतात.

   

महाराष्ट्र महिला व्यासपीठ संपर्क  

श्रीमती रेखा नार्वेकर, संयोजिका
श्रीमती ममता कानडे , कार्यकारी संयोजिका
महाराष्ट्र महिला व्यासपीठ
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२०४५४६० विस्तारित २४४
भ्रमणध्वनी : ८२९१४१६२१६

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft