महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० संबंधी विनामूल्य व्याख्यान...

IMG 20190423 WA0001

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे सन २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेशक्रमांक ९, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० यात आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांवर काम करण्याचा त्याचा प्रभाव या विषयावरती विनामूल्य व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक ७ मे २०१९ रोजी बेसमेंट हॉल, चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखान्याच्या पुढे, नरिमन पॉईंट येथे दुपारी ३ ते ५ या वेळेत अॅड. प्रमोद कुमार उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी कृपया संजना पवार यांच्याशी ( दूरध्वनी – २२०४५४६०, २२०२८५९८, विस्तारित क्र. २४४ अथवा भ्रमणध्वनी ८२९१४१६२१६) वर संपर्क साधावा.

वाचे बरवे कवित्व रमणीय काव्यमैफलीचे आयोजन...
IMG 20190412 WA0026
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ आणि रंगस्वर तर्फे वाचे बरवे कवित्व या काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आले होते. अनुपमा उजगरे, गौरी कुलकर्णी, लता गुठे, ज्योती कपिले, पल्लवी बनसोडे, संगिता अरबुने, उषा चांदुरकर, जयश्री संगितराव, हेमांगी नेरकर, प्रतिभा सराफ आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठाच्या प्रमुख संयोजिका रेखा नार्वेकर यांनी स्वलिखित कविता अणि गझल सादर केली. कवितेवर प्रेम करणा-या प्रेक्षकांच्या उपस्थितीत ही काव्यमैफल अत्यंत सुरेख पार पडली.

   

महाराष्ट्र महिला व्यासपीठ संपर्क  

श्रीमती रेखा नार्वेकर, संयोजिका
श्रीमती ममता कानडे , कार्यकारी संयोजिका
महाराष्ट्र महिला व्यासपीठ
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२०४५४६० विस्तारित २४४
भ्रमणध्वनी : ८२९१४१६२१६

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft