महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम व्याख्यानाचे आयोजन...

5 8 2019 11 23 28 AM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे सन २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ९, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० यात आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांवर काम करण्याचा त्याचा प्रभाव या विषयावरती विनामूल्य व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अॅड. प्रमोद कुमार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विभाग १५४ब-२ मध्ये सहकारी संस्थांची नोंदणी कशी केली जाते, सहकारी संस्था कशा पद्धतीने काम करतात, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम अंतर्गत येणा-या सर्व गोष्टींबाबत त्यांनी संपूर्ण माहिती दिली.

महाराष्ट्र महिला व्यासपीठ आयोजित स्वाक्षरी विश्लेषण कार्यशाळा...

शिका व कमवा

WhatsApp Image 2019 05 10 at 12.39.32 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठतर्फे मंगळवार दि. १४ मे रोजी दुपारी १ते ६ या वेळेत बेसमेंट सभागृह, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखानाच्या बाजूला, नरीमन पॉइंट येथे स्वाक्षरी विश्लेषण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा मराठीतून होणार असून या कार्यशाळेचे शुल्क रू. २०००(GST सहित) आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थींना कोर्स मटेरियल व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  
या कार्यशाळेत प्रगतीतील अडथळे दूर करण्याचे उपाय, आर्थिक प्रगतीचे व यशाचे उपाय, राग नियंत्रित कसा करणे, आत्मविश्वास वाढविणे, स्मरणशक्ती व एकाग्रता वाढविणे, ताण तणाव कमी करण्याचे उपाय 
अशा विविध गोष्टी शिकता येणार आहेत. या कार्यशाळेचे प्रशिक्षक प्रकाश मोहिते असणार आहेत तसेच कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आदर्श स्वाक्षरी कशी असावी हे शिकवण्यात येईल. 
कार्यशाळेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संजना पवार २२०४५४६० / २२०२८५९८ विस्तारित २४४ अथवा भ्रमणध्वणी क्रमांक ८२९१४१६२१६ यावर संपर्क करावा.

   

महाराष्ट्र महिला व्यासपीठ संपर्क  

श्रीमती रेखा नार्वेकर, संयोजिका
श्रीमती ममता कानडे , कार्यकारी संयोजिका
महाराष्ट्र महिला व्यासपीठ
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२०४५४६० विस्तारित २४४
भ्रमणध्वनी : ८२९१४१६२१६

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft