'सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन सर्टिफिकेट कोर्स' ला सुरूवात...

IMG 20190601 112320

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे 'सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन सर्टिफिकेट कोर्स' दिनांक १ जूनपासून सुरू झाला. १ जून ते २८ जुलै २०१९ या कालावधी मध्ये (शनिवार-रविवार) दुपारी ११ ते ५ या वेळेमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधील बेसमेंट हॉल मध्ये हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोर्स पूर्ण झाल्यानंतर परिक्षा घेण्यात येणार आहे तसेच प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणा-यास प्रमाणपत्र दिले जाणार आहे. कोर्सचा होणारा उपयोग, फायदे, कोर्सबद्दल संपूर्ण माहिती कार्यकारी संयोजिका ममता कानडे यांनी दिली. यावेळी अॅड. प्रमोद कुमार, प्रभाकर चुरी उपस्थित होते.

स्वाक्षरी विश्लेषण कार्यशाळा संपन्न...

 5 15 2019 1 02 54 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठतर्फे स्वाक्षरी विश्लेषण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. स्वाक्षरीमुळे आपल्या आयुष्यात खूप फरक पडत असतो. स्वाक्षरी करण्याच्या पद्धतीवर आपल यश-अपयश अवलंबून असतं. स्वाक्षरीवरून माणसाची विचार करण्याची पद्धत, माणसाचा स्वभाव ओळखता येतो, असे प्रशिक्षक प्रकाश मोहिते म्हणाले.
या कार्यशाळेत स्वाक्षरी कशी असावी, प्रगतीतील अडथळे दूर करण्याचे उपाय, आर्थिक प्रगतीचे व यशाचे उपाय, राग नियंत्रित कसा करणे, आत्मविश्वास वाढविणे, स्मरणशक्ती व एकाग्रता वाढविणे, ताण तणाव कमी करण्याचे उपाय अशा विविध विषयांवर प्रकाश मोहिते यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यशाळा पूर्ण करणा-यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

   

महाराष्ट्र महिला व्यासपीठ संपर्क  

श्रीमती रेखा नार्वेकर, संयोजिका
श्रीमती ममता कानडे , कार्यकारी संयोजिका
महाराष्ट्र महिला व्यासपीठ
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२०४५४६० विस्तारित २४४
भ्रमणध्वनी : ८२९१४१६२१६

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft