"महिला गौरव पुरस्कार १९-२०" अनुवादक सविता दामले यांना प्रदान...

WhatsApp Image 2021 03 08 at 4.59.02 PM 1


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे 'महिला गौरव पुरस्कार'चे आयोजन करण्यात आले होते. पुरस्काराचे यंदाचे दुसरे वर्ष होते. कार्यक्रमाची सुरुवात शारदास्तवनाने व दीप प्रज्वलाने झाली. यानंतर संयोजिका रेखा नार्वेकर यांच्या हस्ते प्रास्ताविक व मान्यवरांना पुष्पगुच्छ व ग्रंथ प्रदान करण्यात आले. संगीतकार राहुल सेठ निर्मित महिला गौरव गीत यावेळी उद्घाटनपर दाखविण्यात आले. महिला गौरव पुरस्काराच्या सन्मानपत्राचे वाचन जयश्री आपटे यांनी केले. यंदाचा 'महिला गौरव पुरस्कार' अनुवादक सविता दामले यांना प्रदान करण्यात आला. त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कांचन अधिकारी यांनी आपले विचार व्यक्त केले. सामाजिक विषयावर कविता भडके यांनी "आहारशास्त्र व जणजागृती" पुजा कारेकर यांनी "हरविलेले बालपण" व वैशाली चेकेपाटील यांनी सामाजिक कार्य व समस्या याविषयावर आपले मनोगत व्यक्त केले . ज्येष्ठ साहित्यिका संजीवनी खेर यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचा
महिला गौरव पुरस्कार अनुवादक सविता दामले यांना...

3 4 2021 9 14 17 AM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ आयोजित जागतिक महिला दिननिमित्त 'महिला गौरव पुरस्कार" अनुवादक  सविता दामले यांना सोमवार, ८ मार्च २०२१ रोजी सायं ४ वाजता, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कांचन अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी अनघा गोखले, पूजा कारेकर, कविता भडके, वैशाली चेकेपाटील सामाजिक विषयांवर मनोगत व्यक्त करणार आहेत तर संगीतकार राहुल सेठ निर्मित महिला गौरव गीत होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संजीवनी खेर (ज्येष्ठ साहित्यिका) भूषविणार आहेत. 

   

महाराष्ट्र महिला व्यासपीठ संपर्क  

श्रीमती रेखा नार्वेकर, संयोजिका
श्रीमती ममता कानडे , कार्यकारी संयोजिका
महाराष्ट्र महिला व्यासपीठ
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२०४५४६० विस्तारित २४४
भ्रमणध्वनी : ८२९१४१६२१६

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft