महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ

महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ या संस्थेची स्थापना अर्थशास्त्रज्ञ कै. डॉ. धनंजयराव गाडगीळ यांनी सन १९५७ मध्ये केली. ही संस्था महाराष्ट्राचा आर्थिक व औद्योगिक विकास वेगाने आणि संतुलिकपणे होण्यासाठी संशोधनाचे कार्य करते. महाराष्ट्रामध्ये उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असणा-या उद्योजकांना सांख्यिकीय माहिती पुरविणे, योग्य निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयांची माहिती देणे, चिकित्सक पद्धतीने अधिकृत आकडेवारी पुरविणे तसेच महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या उद्योगसंधीविषयी माहिती देण्याचे काम ही संस्था करते. संस्थेतर्फे उद्योजकांसाठी परिसंवाद, परिषदा व कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व सदरची संस्था परस्पर सहकार्याने काम करतात. या उपक्रमासाठी महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाला केंद्र इमारतीतील तिस-या मजल्यावरील जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft