बॉम्बे सिटी पॉलिसी रिसर्च फाउंडेशन (बॉम्बे फर्स्ट)
बॉम्बे फर्स्ट ही संस्था बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंड़स्ट्रिज आणि बॉम्बे सिटी पॉलिसी रिसर्च फाउंडेशन या संस्थांच्या पुढाकाराने व औद्योगिक / वाणिज्य क्षेत्रातील अनेक आस्थापनांच्या आर्थिक पाठबळावर १९९५ मध्ये अस्तित्वात आली. या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट मुंबई शहरातील वाढत्या लोकसंख्येचे आव्हान स्वीकारुन येथील पायाभूत सुविधामध्ये विकास करुन नागरिकांच्या राहणीमानाची पातळी उंचावणे, काम करण्याच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणणे आणि भांडवली गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हे आहे. मुंबई शहराच्या विविध प्रश्नांवर विचार करण्यासाठी शासन, महानगरपालिका व इतर स्वयंसेवी संस्था यांचे समन्वयक म्हणून ही संस्था कार्य करते. संस्थेचा वाढता व्याप लक्षांत घेऊन प्रतिष्ठानने या संस्थेला केंद्र इमारतीतील तिस-या मजल्यावर जागा दिली आहे.