मुंबई नवमहाराष्ट्र युवा अभियान विभागातर्फे
समाज कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग


समाजातील चालू घडामोडी, सामाजिक चळवळ, आणि प्रबोधनात्मक या संदर्भातील माहिती समाजातील तरुण वर्गापर्यंत पोहोचावी. आपल्यासारख्या सुजाण नागरिकांनी, तरुणांनी आपल्या देशाबद्दल, समाजाबद्दल, कायद्यांबद्दल, जाणून घ्यावे, आपण जीवन जगत असतांना आपणास वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक, राजकीय, तसेच शासकीय, खाजगी, स्वयंसेवी संस्था, शाळा, विद्यालय, महाविद्यालय, लहान मुलांचे हक्क व अधिकार, पोलीस, सरकारी दवाखाने, न्यायालये, वेगवेगळे सरकारी कार्यालय त्यांचे कामकाज व कार्यप्रणाली यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी आणि या प्रशिक्षणातून प्रामाणिक समाज कार्यकर्ता घडून यावा म्हणून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई नवमहाराष्ट्र युवा अभियान विभागातर्फे समाज कार्यकर्ता प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यास वर्गचे आयोजन केले आहे.

  समाज कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग

महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील महाराष्ट्राचा थोर वैचारिक वारसा यांनी पुढे नेला. सामान्य माणसांना जागविण्याचे आणि त्यांच्या जागृत संघटीत कर्तृत्वातून आधुनिक महाराष्ट्राची पाया उभारणी करण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे. त्यांनी दिलेल्या दिशा आणि दृष्टी अनेक पिढ्याना मार्गदर्शक ठरणा-या आहेत. त्यांचे हे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईची स्थापना करण्यात आली आहे. वरील उद्दिष्टपूर्तीसाठी नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने समाज कार्यकर्ता प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासवर्ग चव्हाण सेंटरमध्ये सुरु करण्यात आलेला आहे. हे वर्ग महिन्याच्या प्रत्येक रविवारी घेण्यात येतात. या कोर्सेसचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता हाताळले जाणारे विषय केवळ वैचारिक अथवा बौध्दिक पातळीवरचे नसून सध्याचे समाजस्थिती लक्षात घेता सदर विषयाची योग्य ती सांगड व्यावहारिक विषयांशी घातली जात आहे. तसेच केवळ ऐकण्यावर भर दिला जाणार नसून प्रशिक्षणार्थीकडून कार्यपाठ आणि प्रात्यक्षिकाच्या स्वरुपात कृती व त्याच्या प्रत्यक्ष सहभागावर भर दिला जातो.

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft