तंबाखू नियंत्रण अभियान..

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने आज खूप समस्या समाजात वाढत आहे व ही जागतिक समस्या दिवसेदिवस उग्र स्वरुप धारण करत आहे. याची झळ भारतासारख्या विकसनशील देशाला बसत आहे. प्रामुख्याने मुलांना, तरुण पिढीला बसत आहे. या समस्येला नियंत्रित करणे किंवा अशा पदार्थांवर बंदी घालणे खूप गरजेचे झालेले आहे. ही समस्या लक्षात घेता संस्थेच्या तंबाखू नियंत्रण विभागामार्फत महाराष्ट्रात तंबाखूमुक्त अभियान राबविले जात आहे व तंबाखू विरोधी व्यापक चळवळ उभारलेली आहे. या उपक्रमाचे समन्वयक कॅप्टन आशिष दामले असून त्यांच्या सोबत श्री. कैलास मालखेडे, श्रीमती मालखेडे व सह-समन्वयक म्हणून काम पाहतात. या उपक्रमाला 'सलाम मुंबई फाऊंडेशन' यांचे मोलाचे सहकार्य लाभते. मुलांना तंबाखूच्या धोक्यापासून दूर ठेऊन, त्यांच्या जीवनामध्ये जीवन कौशल्याचा विकास करणे व त्या आधारे भविष्यातील सशक्त भारताच्या निर्मितीचे उद्दिष्ट संस्थेने ठेवले आहे. तंबाखू हा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनात दिवसेंदिवस वाढ होत असून प्रामुख्याने युवा वर्ग हा मोठ्या संख्येने व्यसनाधीनतेला बळी पडत आहे. व्यसनाधीनतेचे हे अतिशय गंभीर चित्र आहे. तंबाखू जीवघेणी आहे.

समाजातील विविध वयोगटासाठी काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ज्यात प्रामुख्याने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, तंत्र शिक्षण देणा-या संस्था तेथे शिक्षण, कर्मचारी व विद्यार्थ्यां सोबत कार्यशाळा, विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. ज्या द्वारे सर्वांना तंबाखूजन्य पदार्थ व त्यांच्या सेवनाचे होणारे दुष्परिणाम कायदे, तंबाखूयुक्त संस्था अशा विषयावर मार्गदर्शन केले जाते. पोलीस, मजदूर, चालक-वाहक अशाही वर्गांसाठी विशिष्ट कार्यक्रम घेतले जातात. पथनाट्ये, पोस्टर प्रदर्शन, रॅली, गाणी, नाटिका, एकांकिका, कीर्तन, भजन अशाही कार्यक्रमातून समाज प्रबोधन केले जाते. त्यामुळे आजपर्यंत अनेक संस्था तंबाखूजन्य पदार्थाच्या अधीन होताना दिसतात. तंबाखूमुळे असंख्य लोकांचा जीव जात आहे जो आपण वाचवू शकतो. तंबाखू आणि धुम्रपानात ४००० हून अधिक घातक रसायने आहेत. ज्यात २०० विषारी तर ६० कर्कजन्य आहेत. तंबाखूमुळे कॅन्सरसोबत हृदयविकार, मेंदूचा धक्का, फुफ्फुसाचे आजार, अंधत्व, नपुसकत्व, वंध्यत्व आणि इतर अनेक रोग होतात. यात असंख्य लोक यापूर्वी बळी पडले आहेत आणि दिवसेंदिवस बळींची संख्या वाढत आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने सामाजिक विधायक कामांसाठी कायम पुढाकार घेतला आहे. याच कार्यप्रणालीचा भाग म्हणून तंबाखू नियंत्रण अभियान आज महाराष्ट्रात राबविले जात आहे. तंबाखू आणि तंबाखूचे सेवन आपल्याला सर्रास दिसते. त्यासोबत तंबाखू सेवनाच्या घातक परिणामांची जाणीव करुन देणा-या जाहिरातीदेखील दिसतात. तंबाखूच्या विक्रीवर नियंत्रण असणारे कायदे झाले आहेत. मा. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रात गुटखाबंदीची घोषणा केली आणि लगेच ती अंमलात देखील आणली. इतक्या आघाड्यांवर तंबाखू विरोधी मोहीम उघडून देखील महाराष्ट्रातील तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी झालेले दिसत नाही. काही अभ्यासकांच्या मते १८ वर्षे वयापर्यंत एखादी व्यक्ती तंबाखूचे सेवन करीत नाही ती व्यक्ती तंबाखूपासून दूर राहते. १८ वर्षांखालील व्यक्तींना तंबाखूची विक्री करण्यावर कायद्याने बंदी असून देखील अनेक मुले लहान वयातच तंबाखूच्या आहारी गेलेली दिसतात. प्रौढांमध्ये देखील तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तंबाखू विरोदी कायद्यामधील दंडाची रक्कम वाढवणे, तसेच या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. शाळा कॉलेजच्या आसपास १०० यार्डाच्या परिसरात एकही तंबाखू विक्रीचे केंद्र असू नये, तसेच तंबाखू विक्री केंद्रावर तंबाखूजन्य पदार्थ प्रदर्शनाप्रमाणे मांडले जाऊ नये या गोष्टी काटेकोरपणे पाळल्या जाव्यात यासाठी प्रतिष्ठान तंबाखू नियंत्रण अभियान उपक्रमाद्वारे सतत पाठपुरावा करत आहे.

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft